पाथरी(लक्ष्मण उजगरे) पाथरी तालुक्यामध्ये गोदावरी नदी पात्राचे पात्र मोठे असल्याकारणाने तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा हा काही नवा नाही.जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशाने पाथरी तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पथक तयार केली मात्र कारवाई म्हणावी तशी दिसून येत नाही कारण मागील पंधरा दिवसांमध्ये आज दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे..
सविस्तर बातमी अशी की, पाथरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा हा काही नव्याने होत नाही परंतु पाथरी तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार एस एन हंदेश्वर यांनी दिनांक 26 डिसेंबर 2024रोजी वाळूची अवैध उपसा व वाहतूक बंद करण्यासाठी पथके स्थापन केली परंतु आज रोजी पर्यंत म्हणजेच दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी पंधरा दिवस उलटले असून या पंधरा दिवसात नेमण्यात आलेल्या पथकाकडून मात्र दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
ती पुढील प्रमाणे गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 सकाळी सातच्या सुमारास मौजे ढालेगाव येथे गोदावरी नदी पात्रात अवैध रेती वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांना मिळताच ढालेगाव सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी आर.यु.शर्मा व मंडळ अधिकारी शिवाजी भरकड यांना संबंधित वाहनावर कारवाईसाठी आदेशित करून संबंधित वाहन तहसील कार्यालय पाथरी येथे पुढील दंडात्मक कारवाईसाठी आणून लावण्यात आले आहे.तर दुसरी कारवाई मौजे नाथरा येथे गोदावरी नदीपात्रात केनिच्या साह्याने रेती काढण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी व तहसीलदार एस.एन. हंदेश्वर यांना मिळाली असता महसूल पथक नाथरा येथे रवाना झाले.नाथरा सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी साजिद सय्यद,विजय भदर्गे,संदीप बडगुजर व आदनान अन्सारी यांनी गोदावरी नदीमध्ये पाहणी केल्या असता महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर व अन्य साहित्य आढळून आले पथकाने सदरील ट्रॅक्टर हे तहसील कार्यालयात आणून पुढील कारवाईसाठी सादर केले आहे माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी झालेल्या आढावा बैठकीत अवैध गौण खनिज व वाहतूक, उपसा करणाऱ्यावर दिलेल्या सूचनेनुसार कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे