Sunday, July 20, 2025

उदारमतवादी,तरुण,उच्चशिक्षित प्रधानमंत्री थायलंडला स्थिर सरकार देतील?

Spread the love

थायलंड म्हटलं की बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असलेला देश म्हणून ओळखला जातो नव्हे तर त्या देशाचा राष्ट्रधर्म आहे . थायलंडचा प्रमुख धर्म नसून तो देशाचा थायलंड हा आग्नेय आशियातील एक देश. या देशाच्या पूर्वेस लाओस व कंबोडिया, दक्षिणेस थायलंडचे आखात व मलेशिया तर पश्चिमेस अंदमानचा समुद्र व ब्रह्मदेश आहे. विस्ताराच्या दृष्टीने ५,१३,१२० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला, आकारमानानुसार येमेनपेक्षा काहीसा छोटा व स्पेनपेक्षा काहीसा मोठा विस्तार असलेला हा देश जगातला ५१ व्या क्रमांकाचा मोठा देश आहे. भूरचनेनुसार थायलंडमध्ये पर्वतीय प्रदेश,पठारी प्रदेश, नदीखोऱ्यांपासून, तसेच अगदी संयोगभूमीसारख्या भूरूपांपर्यंतचे वैविध्य आढळते. अश्या निसर्गरम्य देशाची ओळख जगाला आकर्षित करते. बँकॉक ही या देशाची राजधानी व त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही आहे पण प्रशासकीय कारभार हा संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो. थायलंडचे वार्षिक दरडोई उत्पन्न ५३९.८७१ अब्ज अमेरिकन डॉलर आहे. वर्तमान थायलंडच्या भूप्रदेशावर सुमारे ४०,००० वर्षांपासून मानवाचे वास्तव्य असल्याचे पुरावे आहेत. या प्रदेशातील संस्कृतीवर प्राचीन काळापासून म्हणजे इ.स.च्या पहिल्या शतकातील फूनान राज्यापासून – भारतीय उपखंडातील संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. फूनान राज्यानंतर येथे ख्मेर साम्राज्याची सत्ता इ.स.च्या १३ व्या शतकापर्यंत चालली. ख्मेरांचे साम्राज्य लयास गेल्यावर काही काळ ताय, मोन, ख्मेर, मलय समूहांची छोटी छोटी राज्ये उभी राहिली. इ.स. १२३८ साली आजच्या थायलंडच्या उत्तर भागात सुखोथाई साम्राज्य उदयास आले. ही सयाममधील पहिली बौद्ध सत्ता मानली जाते. मात्र अवघ्या एका शतकानंतर (इ.स.च्या १४ व्या शतकाच्या मध्यावर) दक्षिणेकडील चाओ फ्रया नदीच्या तीरावर उदयास आलेल्या अयुध्या साम्राज्याने सुखोथाई व परिसरातील अन्य सत्तांना झाकोळून टाकले. या साम्राज्याच्या काळात अयुध्या नगराचा व्यापार अरबी द्वीपकल्प, पर्शिया, भारत, चीन इत्यादी आशियाई व्यापारी केंद्रांशी, तसेच डच, पोर्तुगीज, ब्रिटिश इत्यादी युरोपीय व्यापाऱ्यांशी चालत असे. इ.स. १७६७ साल बर्मी सैन्याने अयुध्या लुटून उद्ध्वस्त केली. तेव्हा राजा तक्षिणाने अजून दक्षिणेस जाऊन चाओ फ्रया नदीच्या तीरावरच्या धोनपुरी या ठाण्यास आपली राजधानी हलवली व तेथून १५ वर्षे राज्य चालवले. इ.स. १७८२ मध्ये बुद्ध योद्फा चुलालोक या सेनाधिकाऱ्याने तक्षिणाची राजवट उलथून चक्री घराण्याची सत्ता स्थापली व राजधानी म्हणून बांकोकास निवडले. चक्री घराण्याच्या राजवटीपासूनच्या या काळास रतनकोशिन कालखंड असे अभिधान असून, थायलंडाच्या आधुनिक पर्वाचा तो आरंभ मानला जातो. इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात आशिया व आफ्रिका खंडातील अन्य भूप्रदेशांत वसाहतवादाचा शिरकाव होत असताना मात्र थायलंड कधीच कोणत्याही युरोपीय वसाहतवादी सत्तेपुढे नेमला नाही. ही बाब विशेष. आग्नेय आशियातील वर्चस्वस्पर्धेत फ्रेंच व ब्रिटिश अश्या दोन्ही वसाहतवादी सत्तांशी चातुर्याने राजनैतिक व्यवहार जपत थायलंडने आपले सार्वभौमत्व अबाधित राखले. क्षेत्रफळाने लहान असलेल्या देश फ्रेंच व ब्रिटिशांचा गुलाम झाला नाही. यावरूनही थायलंडचा इतिहास थायलंड वासियांना आणि आशिया खंडातील तमाम देशांनी धडा घ्यावा असा एवढ्याशा देशाने विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धात जपानला सहकार्य केले. त्यानंतर काळानुरूप मात्र थायलंड अमेरिकेच्या मित्रपक्षात सामिल झाला.हा भाग वेगळा.

   थायलंड मधील ९५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. येथे ख्रिश्चन, मुस्लिम व हिंदू अनुयायी अल्पप्रमाणात आढळतात. थायलंड देशाला बौद्ध भिक्खूंचा देश असेही म्हणतात कारण येथे बौद्ध भिक्खूंची संख्या अन्य बौद्ध देशांमधील भिक्खूंपेक्षा सर्वाधिक आहे. या देशात ४०, ००, ००० पेक्षा अधिक बौद्ध भिक्खू आहेत. या नगरीचे प्राचीन अवशेष प्राचीन भारतीय संस्कृतीचा परिचय करून देतात. बुद्ध धम्माची बौद्ध संस्कृती येथे विराजमान आहे. देशातील प्रत्येक घरासमोरच भगवान बुद्ध यांचे चित्र लावलेले दिसते. अश्या बौद्ध धर्म असलेल्या देशाचे नेतृत्व सध्या तरुण पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा करीत आहेत. १६ ऑगस्ट २०२४ पासून थाई पक्षाच्या त्या नेत्या आहेत.२०२३ पासून थाई पार्टी शिनावात्रा राजकीय कुटुंबातील आहे. ती थाक्सिन शिनावात्रा यांची सर्वात लहान मुलगी आणि यिंगलक शिनावात्रा यांची भाची आहे. त्यामुळे त्यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यात विशेष काही असे कर्तृत्व नाही वाटणे साहजिक आहे.पण अती सर्वात तरुण व्यक्ती आणि पद धारण करणारी दुसरी महिला हे विशेष.थाई राजकारणी असलेल्या शिनावात्रा या २० ऑगस्टपासून थाई देशाच्या पंतप्रधान म्हणून बौद्ध राष्ट्र म्हणून पुढे नेतील.

    २१ ऑगस्ट १९८६ रोजी बँकॉक येथे जन्मलेल्या शिनावात्राचे शिक्षण पदवीपर्यंत आहे. तिचे कनिष्ठ माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पूर्ण झाले आणि तिचे उच्च माध्यमिक शिक्षण माटर देई स्कूलमध्ये पूर्ण झाले.समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रावर लक्ष केंद्रित करीत राज्यशास्त्रात बीए त्यांनी केले आहे.त्यानंतर इंग्लंडमध्ये अभ्यास सुरू ठेवला आणि तेथील विद्यापीठातून इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एमएससी पदवी प्राप्त केली . शिक्षणानंतर उद्योग क्षेत्रातही तिने पाय रोवले.एससी ॲसेट कॉर्पोरेशनच्या सर्वात मोठ्या शेअर होल्डर आहेत आणि थायकॉम फाउंडेशनच्या संचालक आहेत.२०२२ पर्यंत, त्यांच्याकडे एकूण २१ कंपन्या होत्या ज्यांचे मूल्य अंदाजे ६८ बिलियन ( US$ २ बिलियन) आहे. म्हणजे उद्योग क्षेत्रात चांगली पकड असलेली आणि उच्च शिक्षित तरुणी थायलंडला प्रधानमंत्री म्हणून लाभली आहे.२७ ऑक्टोबर २०२३ रोजी, पक्षाचा नवीन नेता होण्यासाठी पक्षाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेत पीटीपी च्या मुख्य सदस्यांद्वारे शिनावात्रा यांची निवड करण्यात आली, त्यांना एका अनुपस्थितीसह २८९ मते मिळाली. १४ ऑगस्ट २०२४ रोजी थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने तत्कालीन प्रधानमंत्री श्रेथा यांना पदावरून हटवल्यानंतर , शिनावात्रा यांना थाई यांनी त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. सत्ताधारी आघाडीतील इतर पक्षांनी कोणतेही पर्याय न दिल्यामुळे १६ ऑगस्ट रोजी तिचे नामांकन थायलंडच्या प्रतिनिधीगृहाने मंजूर केले आणि १८ ऑगस्ट रोजी राजा वजिरालॉन्गकोर्न यांच्या समर्थनानंतर अधिकृतपणे शपथ घेतली .एप्रिल २०२२ मध्ये थाई पार्टीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना, शिनावात्रा म्हणाली होती की थायलंडमध्ये सत्ताबदल पाहायचा आहे आणि देशाच्या पंतप्रधानपदासाठी उभे राहण्यापूर्वी अधिक अनुभव मिळवायचा आहे. हे वाक्य तिने सत्य केले खरे पण खरी सतत राजकीय अस्थिर राहिलेल्या थायलंडला प्रधानमंत्री शिनावात्रा स्थिर सरकार देतील.एवढीच अपेक्षा.

 

 

– पदमाकर उखळीकर ,

  मो.९९७५१८८९१२.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news