Friday, April 4, 2025

*‘एमएसएमई’ बाबत बुधवारी;जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा*

Spread the love

 

परभणी, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यात राज्य व केंद्र शासनाच्या उद्योग विभागाकडून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, या योजनांची माहिती उद्योजकांना एकाच वेळी उपलब्ध होण्यासाठी सर्व विभागांच्या सहकार्याने बुधवार, (दि.२४) रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यशाळेला जास्तीत जास्त उद्योजकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे.

महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था, उत्पादक प्रक्रिया उत्पादक केंद्र तसेच राज्य शासन आणि संबंधित उपक्रमाचे अधिकारी जिल्हा निर्यात प्रचारक समितीचे निर्यातसंबंधी कामकाज पाहणारे घटक, संशोधक, बँक प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. बळे यांनी केले आहे.

एमएसएमई क्षेत्रावर भर देऊन त्याची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच उद्योगांच्या विकासासाठी राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग, त्याचे उपक्रम योजना उद्योग संचालनालयाकडून हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे

.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news