Saturday, April 5, 2025

ओबीसी समाजास धर्माच्या नावाने फसवले जाते.-एॅड.बाळासाहेब आंबेडकर

Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)आपण सर्व सामान्य पक्षाबरोबर न रहाता धार्मिक पक्षाबरोबर राहून त्यांना मतदान करता ते आपल्या अडचणी वेळी येतात का? ओबीसी आरक्षण अडचणीत आहे. ओबीसी समाजास धर्माच्या नावाखाली फसवले जात असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.आरक्षण बचाव यात्रा अंबाजोगाई शहरांमध्ये आली असता प्रथम सर्व विविध पक्षातील, विविध संघटनातील ओबीसी बांधव महिला पुरुष तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी शहरांमधून भव्य रॅली काढून त्याचा समारोप मुकुंदराज स्वामी सभागृहात सभेत झाला. यावेळी एड. बाळासाहेब आंबेडकर हे बोलत होते व्यासपीठावर ओबीसी समाज घटकाचे असंख्य नेते गण उपस्थित होते यात एड. किशोर गिलवरकर अड. अरविंद मोठेगावकर ,संजय गंभिरे,बाप्पा पांचाळ, दिनेश परदेशी ,बीबिशन फड,पंडित ,वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे, प्रसिद्धीप्रमुख गोविंद मस्के यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की आपण कायम सर्तक राहिले पाहिजे जर आपण सर्तक नाही राहिलो तर मिळालेल ही काढून घेतले जाईल. ओबीसीचे ताट वेगळं असलं पाहिजे नव्याने देणाऱ्यांचे ताट वेगळे असले पाहिजे, आम्ही बाजूला पडलो नाही.55 लाख ओबीसी प्रमाणपत्र चार- पाच महिन्यात वाटले ते बोगस वाटले ते रद्द व्हायला पाहिजे, कुठल्याच पक्षाने ही भूमिका घेतली नाही आम्ही बरोबरच आहोत जात प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने वाटल्या गेल्यामुळे आम्ही चुकीच्या बाजूने राहणार नाही. प्रत्येक गावात दोन तट असतात एक मराठा व एक ओबीसी असे तट आहेत.ओबीसी समाज राजकीय पटलावर लढला गेला नाही ओबीसींना विनंती हा सामाजिक विषय होऊ देऊ नका राजकीयच राहू द्या,आपण कोणत्याही पक्षात असो आपल्या पक्षास आपल्याला वैचारिक भांडण करावे लागेल त्यांना विचारावे लागेल की ओबीसीला किती जागा देणार? कार्यकर्त्यांनी ओबीसींना 50 टक्के विधानसभेच्या जागा देण्यात याव्या यासाठी आग्रही राहावे.तुम्ही कोणत्याही पक्षात असू द्या तुम्ही प्रत्येक पक्षात उपरे आहात राजकीय पक्ष समाजाने वाटून घेतले आहेत; प्रत्येक पक्ष एका विशिष्ट जातीचा ठरवला जात आहे व त्यात ओबीसी आहे पण ओबीसीला कुठेच काही मिळत नाही .राजकीय पक्ष सर्व समाजाचे असले पाहिजे विशेष समाजाचे पक्ष असू नये, जरागे यांची मागणी चुकीची की बरोबर आहे हे कोणीच मांडत नाहीत. ओबीसी आरक्षण धोक्यात आहे कोर्टात जिंकाल कोर्टाने निकाल दिला असला तरी ओबीसी आरक्षणाचा धोका विधानसभेनंतर आहे.

 

ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ओबीसी घटक समाजाच्या कंसामध्ये अडकला आहे ओबीसीची ताकद जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत ओबीसी टिकाव धरू शकणार नाही ओबीसींचा राजकीय चेहरा जन्माला आलाच नाही, समाज म्हणून आला आहे आरक्षण वाचवायचे असेल तर राजकीय चेहरा आला पाहिजे किमान विधानसभेमध्ये शंभर आमदार तरी निवडून आले पाहिजे. आपण धार्मिक पक्षाबरोबर राहून पक्षास मतदान केले कार्यकर्त्यांना धर्माच्या नावाखाली फसवले जात जाते हे लक्षात ठेवा ज्यांना मतदान केले ते तुमच्या बाजूने आहेत का? आरक्षणाला त्यांचा विरोध आहे.ओबीसी समूहाची वाटचाल आत्मघाती कडे चालू आहे, राखण संरक्षण होणे गरजेचे आहे पुढे येऊन ओबीसी आरक्षण वाचवायचे आहे. सात आगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे लाखो लोकांनी एकत्र होऊन मंडल आयोग स्मरण केले पाहिजे. ओबीसी समाजाने व्यक्तिगत स्वार्थ व समाजाचा स्वार्थ यात प्राधान्य कोणाला याचा विचार करावा लागेल स्वतःची लढाई स्वतः चढावी लागेल असे परखड विचार भाषणात व्यक्त केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर,एड. किशोर गिलवरकर अड.अरविंद मोठेगावकर ,बीबिशन फड यांची समयोचित भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश कांबळे,सुञसंचलन गोविंद मस्के, यांनी केले.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news