Saturday, April 5, 2025

किरण घुंबरे यांची परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड.

Spread the love

पाथरी(प्रतिनिधी)मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची व्दयवार्षिक बैठक परभणी येथे सावली विश्रामग्रहावर रविवार २९ डिसेंबर रोजी संपन्न झाली यात पत्रकार तथा संपादक किरण घुंबरे पाटील यांची मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या परभणी जिल्हा पत्रकारसंघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या वेळी या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रिय सरचिटनिस प्राचार्य सुरेश नाईकवाडे हे होते तर विषेश प्रमुख उपस्थितीत डिजिटल मिडियाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची उपस्थिती होती. या वेळी मंचावर जेष्ट पत्रकार राजा पुजारी,मावळते जिल्हाध्यक्ष राजू हट्टेकर, नुतन जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके या मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी झालेल्या बैठकीत मावळते जिल्हाध्यक्ष राजू हट्टेकर यांच्या २६ महिण्याच्या कार्यकालाच्या कार्यअहवालाचे वाचन केल्या नंतर प्रदेश सरचिटनिस प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी परभणी जिल्हा कार्यकारीनिची बिनविरोध घोषणा केली. यात परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभू दिपके यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून लक्ष्मण मानोलीकर,उपाध्यक्ष (पाथरी) किरण घुंबरे पाटील, कोषाध्यक्ष पदी मोईन खान, प्रदेश प्रतिनिधी म्हणून धाराजी भुसारे यांची निवड घोषित करण्यात आली. या वेळी परभणी महानगर कार्यकारीनी आणि डिजिटल मिडियाची परभणी ग्रामिण आणि महानगर कार्यकारीनी पदाधिकारी यांना निवडीचे प्रमाणपत्र डिजिटल मिपडियाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हापत्रकार संघाच्या निवडी नंतर नुतन पदाधिकारी यांचा अनिल वाघमारे,प्रदेश सरचिटनिस प्राचार्य सुरेश नाईकवाडे, जेष्ठ पत्रकार राजा पुजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकी साठी परभणी महानगर आणि जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते. या वेळी अनिल वाघमारे,राजा पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी अध्यक्षिय समारोप केला.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news