पाथरी (प्रतिनिधी) पाथरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोदावरी पात्र असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागील काही महिन्यापासून आवैध वाळू उपसा व वाहतूक हे काही नव्याने नाही परंतु पाथरी तालुक्यातील काही गावांमध्ये गोदावरी नदी पात्रात पाणी आल्याने या ठिकाणी वाळू काढणे वाळू माफी यांना अवघड झाले आहे परंतु तालुक्यातील गुंज येथून रात्रभर अवैध वाळूचा सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील असलेल्या गोदावरी पात्रातून मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करणे परंतु काही गावात गोदावरीपात्रात पाणी आल्याने त्या ठिकाणाहून रेती उपसा ह सध्या तरी बंद आहे. परंतु गुंज येथील गोदावरी पात्रातून गावातील काही वीस ते पंचवीस वाळू माफियांकडून ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोदावरी मधील वाळू उपसा करून ही वाळू उमरा फाटा ते पाथरी रोडवरील खडकीपर्यंत दूतर्फा वाळूचे ढीगारे दिसून येत आहेत. रोडच्या बाजूला टाकलेली सर्व वाळू रात्रीच्या वेळी मानवत-पाथरीमध्ये टिप्पर हायवाच्या साह्याने वाहतूक करण्यात येते व ही वाळू चढ्या भावाने विकल्या जात असून रात्रभर चालू असलेल्या हायवा व टिप्पर यांनी उन्माद माजवला असल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र महसूल प्रशासन पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन त्वरित गुंज येथील आवैध वाळू उपसा व गुंज खु.ते पाथरी चालू असलेली वाहतूक बंद करावी अशी मागणी जनमानसातून वारंवार होत आहे.