Sunday, July 20, 2025

*चालत्या ट्रॅव्हल्समध्ये तरुणीची प्रसूती अर्भक मृत जन्मल्याने ट्रॅव्हल्स मधून फेकले बाहेर* *पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारात पाथरी-सेलू महामार्गावरील घटना; पोलिसांनी ट्रॅव्हल्स सहित त्या दोघांना घेतले ताब्यात*

Spread the love

पाथरी(प्रतिनिधी) पुणे येथील परभणी कडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बस मध्ये प्रवास करत असलेल्या 19 वर्षीय विवाहितेने प्रसुतीनंतर मृत जन्मलेल्या पुरुष जातीच्या अर्भकाला ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून महामार्गावर फेकले हा सर्व प्रकार तालुक्यातील देवनांद्रा शिवारात १५ जुलै रोजी घडला या प्रकरणी पाथरी पोलिसांनी तत्परता दाखवत ट्रॅव्हल्स सहित दोघांना ताब्यात घेतले आहे . 

पाथरी-सेलु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४५८ वर शहरापासून दोन किमी अंतरावर देवनांद्रा शिवारात हा प्रकार उघडकीस आला.शेतात एका काम करणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहताच ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळवली. सदरील माहिती पोलिसांना मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे,पो.ह.वाघ व ईत्तर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सदरील सर्व प्रकार ऐकून ट्रॅव्हल्सचा शोध घेतला असता सदरील ट्रॅव्हल्स सेलू मार्गे परभणीच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच काही वेळातच सदरील ट्रॅव्हल्सचा शोध पाथरी पोलिसांनी लावला. ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणारी १९ वर्षीय तरुणी आणि २१ वर्षीय तरुणाला पाथरी पोलिसांना ताब्यात घेतले संबधित विषयी मिळालेल्या अधिक माहिती नुसार सदर युवक-युवतीने आंतरजातीय प्रेमसंबंधातून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.ते दोघे उदरनिर्वाहासाठी पुणे येथे कामाला गेले होते.परंतु सोमवारी सदरील युवतीच्या पोटात वेदना होत असल्याने सदरील युवक युवती पुणे येथून परभणीच्या दिशेने येत होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरील तरुणाने सांगितले की प्रवासादरम्यान युवतीची प्रसुती झाली.परंतु अर्भक मृत जन्मले आणि त्यानंतर तिने ते अर्भक पाथरी पासून अवघ्या दोन किलोमीटरवर देवनांद्रा शिवारात खिडकीतून फेकून दिले असे सांगितले. सदरील तरुणीला पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय दवाखाना येथे पाठवण्यात आले असून सदरील सदरील ट्रॅव्हल्स बस ही पाथरी पोलीस ठाण्यात लावण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news