Friday, May 23, 2025

चिमुकली वरील अत्याचार प्रकरणी भव्य आक्रोश मोर्चा आरोपीला फाशी देण्याची मागणी

Spread the love

पाथरी(लक्ष्मण उजगरे)सोनपेठ येथील चार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी कहार भोई समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

सोनपेठ येथील एल आर के इंग्लिश स्कूल शाळेत चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी दि.७ रोजी सोनपेठ पोलीसात दिली होती . या तक्रारीची दखल घेऊन सोनपेठ पोलीसांनी एका संशयित आरोपींवर बालकांचा लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरू केला होता.सदरील तपासात पोलीस दिरंगाई करत असल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी केली तसेच पोलीस संशयित आरोपीला अटक करत नसल्याने समाजात मोठा रोष निर्माण झाला होता. त्यामुळे कहार भोई समाजाच्या वतीने दि.१५ रोजी सोनपेठ तहसील कार्यालयावर भव्य अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण राज्यभरातुन मोठ्या संख्येने कहार भोई समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सोनपेठ येथे हजर झाले होते.

यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ,सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,या प्रकरणात दुसऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी,शाळा प्रशासनावर कारवाई करावी,या प्रकरणात टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पिडीतेला न्याय मिळवुन द्यावा या मागण्या मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड,दिपककुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मोठा बंदोबस्त ठेवला.मोर्चेकऱ्यांनी दिलेले निवेदन प्रशासनाच्या वतीने देवेंद्रसिंह चंदेल यांनी स्विकारले.या मोर्चाला सोनपेठ तालुक्यातील माजी सैनिकांनी पाठींबा देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली.- सोनपेठ तहसील कार्यालयावर चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी कहार भोई समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news