Saturday, April 5, 2025

*जलसंधारण अधिकारी कविराज कुचे यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू* *कविराज कुचे यांनी शासनाची दिशाभूल करत खोटे दस्तावेज तयार करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे निवेदनात नमूद*

Spread the love

परभणी(प्रतिनिधी) परभणी जलसंधारण विभागातील कविराज कुचे यांनी शासनाची दिशाभूल करत खोटे दस्तावेज तयार करून लाखो रुपये हडप केले असल्याची तक्रार हमीद खान पठाण यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे करत कविराज कुचे यांचे निलंबन करावे या मागणीसाठी हमीद खान पठाण मागील चार दिवसांपासून जिल्हाधिकार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत याकडे मात्र जलसंधारण विभागाच्या कविराज कुचे यांच्यावर नेमके आशीर्वाद कोणाचे आहेत हे पाहणं औचित त्याचा आहे. कारण मागील चार दिवसापासून उपोषण सुरू असताना प्रशासनाकडून त्यांच्या उपोषणाची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.

            सविस्तर वृत्त असे की जलसंधारण विभागाकडून 2021 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती तर प्रत्यक्ष कामाची वर्क आर्डर 2022 मध्ये देण्यात आली होती.या वर्क आर्डमध्ये कोथाळा ता .परभणी येथे मंजूर करण्यात आलेला बंधारा मानवत तालुक्यातील कोथळा येथे बांधून सदरील मंजूर बंधाऱ्याच्या दस्तावेजामध्ये खाडाखोड करून शासनाची दिशाभूल करत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या कविराज कुचे यांच्यावर निलंबनाची मागणी करावी अशी मागणी हमीद खान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे केली होती परंतु त्यांच्या निवेदनावर कुठलेही कारवाई न केल्याने हमीद खान पठाण यांनी 15 ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पुराव्यानिशी आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला. आणि जोपर्यंत कविराज कुचे यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी व लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही असे हामिद खान पठाण यांनी माहीती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

      त्याचबरोबर चार दिवस उलटूनही प्रशासनाकडून व जलसंधारण विभागाकडून हामिद खान पठाण यांच्या उपोषणाची अद्यापही दखल घेतली जात नसल्याने हामिद खान पठाण यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने प्रशासन वेळीच लक्ष देऊन जलसंधारण अधिकारी कविराज कुचे यांच्यावर कारवाई कधी करणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news