पाथरी(लक्ष्मण उजगरे)पाथरी तालुक्यामध्ये जलजीवन मिशन प्रकल्पाच्या कामाचा बांधकाम गुत्तेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे खेळखंडोबा झाला असल्याची माहीती माहीती अधिकारात घेतलेल्या माहीतीतुन समोर आले असुन सदरील जलजीवन मिशन योजनेची कामे एकूण कामांच्या टक्केवारी मध्ये 80 टक्के कामे ही अपूर्णच असून याकडे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष होताना दिसून येत असताना येणाऱ्या उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा भटकंती करावा लागणार हे मात्र निश्चित.
सविस्तर बातमी अशी की पाथरी तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 44 गावांमध्ये काम सुरू असून त्यापैकी केवळ सहा गावांमध्येच शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे.परंतु या 100% झालेल्या गावातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामातही विद्युत जोडणी करण्यात आलेली नाही त्यामध्ये बाभळगाव,बाबुलतार,हादगाव बु, जैतापूरवाडी,कासापुरी इत्यादी गावे आहेत.उर्वरीत आनंदनगर,चाटे पिंपळगाव, देवेगाव,मंजरथ,मुदगल, पाथरगव्हाण,रेनापुर,सारोळा, सिमुरगव्हाण,वडी इत्यादी दहा गावांमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे दहा गावांचे कामेच बंद असल्याचे समोर आले आहे तर उर्वरित 18 ते 20 गावात दिलेल्या माहिती अधिकारामध्ये कामे चालू असल्याचे सांगितले आहे परंतु प्रत्यक्ष गावामध्ये कुठलेही काम चालू नसल्याचे गावामधील नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. जलजीवन मिशनच्या 44 गावांना काम पूर्ण करावयाचा एक निर्धारित वेळ दीला गेला असताना देखील 44 पैकी केवळ सहा ते सात गावांमध्येच जलजीवन मिशनच्या कामाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.परंतु त्यांचीही विद्युत जोडणी बाकी असल्याचं माहिती अधिकारात उघड झाले आहे.
अनेक गावात अंतर्गत पाईपलाईन नळ कनेक्शनला फ्री-वेल बसवलेच नाही; याची उच्चस्तरीय चौकशी करणे गरजेचे आहे.
जलजीवन मिशन योजनेचे पाथरी तालुक्यामध्ये 44 गाव वस्त्यांमध्ये कामे चालू असून त्या ठिकाणी गावामध्ये अंतर्गत पाईपलाईन करून नळ कनेक्शन काढून द्यावयाचे आहेत त्यामध्ये पाण्याचा दबाव वाढवण्यासाठी प्रत्येक नळ कनेक्शन ला फ्री-वेल बसवण्याचे सदरील इन्स्ट्रुमेंट मध्ये असताना ते मात्र संबंधित ठेकेदाराने काही अधिकाऱ्यांना धरून ते फ्री-वेल बसवले नाही. सदरील नळ कनेक्शन चे फ्री-वेल नेमके कोणाच्या घशात गेले आहेत हे शोधणे गरजेचे असून याची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून होताना दिसून येत आहे.
टेंडर प्रक्रिया अपूर्ण असल्याकारणाने विद्युत जोडणी झालेली नाही-कनकदंडे(कनिष्ठ अभियंता)
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामांना विद्युत जोडणी का झाली नाही.याची आमच्या प्रतिनिधीने दुरध्वनीवरुन विचारणा केली असता एकूण 22 गावांमध्ये विद्युत जोडणी करावयाचे असून त्यापैकी खालील गावांचे सारोळा,बाणेगाव,मसलातांडा, जैतापूर वाडी,बांदरवाडा, मर्डसगाव,गौंडगाव,फुलारवाडी, डाकू पिंपरी,तुरा,कानसुर इत्यादी ठिकाणचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून पुढील बोरगाव,निवळी,पोहे टाकळी, टाकळगव्हाण तांडा,खेदुळा रामपुरी,मुदगल,ढालेगाव,नाथरा, विटा,डोंगरगाव इत्यादी ठिकाणचे अंदाजपत्रक अद्यापही सादर झाले नसून संपूर्ण अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून निविदा प्रक्रिया पूर्ण करून विद्युत जोडणी करण्यात येणार असल्याचे कनिष्ठ अभियंता कनकदंडे यांनी सांगितले आहे.