पाथरी(लक्ष्मण उजगरे) व्यक्तीमध्ये संयम, शांतता, आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी व्यायामाचे अत्यंत आवश्यकता आहे यासाठी पाथरी शहरामध्ये फिटनेस क्लब ची स्थापना व्हावी असा मानस फिटनेस तज्ञ रेणुका गुप्ता यांनी व्यक्त केला. वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक करताना फिटनेस तथा आहार तज्ञ रेणुका गुप्ता बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ.भावनाताई अनिलरावजी नखाते या उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून दै. लोकमत नांदेड चे उपसंपादक भारत दाढेल, डॉ. भगवान सूर्यवंशी डॉ. प्रा. विजयाताई दाढेल, प्राचार्य किशन डहाळे, मुख्याध्यापक यादव एन.ई. अविराज टाकळकर, केशव महाराज, धोंडीराम कोल्हे, विकास राऊत, विलास नवघरे, सुनील लोंढे, विजय विरकर, अशोक गालफाडे,आदी उपस्थित होते.
प्रत्येक व्यक्तीने आरोग्य जोपासले पाहिजे व निरामय जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे त्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून शास्त्रीय पद्धतीने शारीरिक श्रम, प्राणायाम, योगा,करणे गरजेचे आहे यासोबतच आहार प्रमाणात घेतला पाहिजे, आहाराचे मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती नांदेड येथील फिटनेस तथा आहार तज्ञ रेणुका गुप्ता यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी पवित्र पोर्टल मार्फत नवनियुक्त शिक्षिका सौ. सुप्रिया नखाते तसेच जायकवाडी येथे जाऊन जलपूजन करताना स्व. शंकररावजी चव्हाण आणि स्व.सखारामजी नखाते यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे अविराज टाकळकर, धोंडीराम कोल्हे, केशव महाराज, विकास राऊत, विलास नवघरे, यांचा वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी च्या वतीने सौ.भावनाताई नखाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत दाढेल यांनी केले, याप्रसंगी उपस्थितांना डॉ. भगवान सूर्यवंशी, विजय विरकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य किशन डहाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राजकुमार कांबळे यांनी केले.