Saturday, April 5, 2025

परदेशात उच्च शिक्षण आणि करिअर संधीवर माहितीपूर्ण मोफत सेमिनारचे आयोजन

Spread the love

छत्रपती संभाजीनगर- परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी स्मार्ट च्या वतीने 27 जुलै शनिवार रोजी सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत हॉटेल अमरप्रीत जालना रोड येथे परदेशात उच्च शिक्षण आणि करिअर संधीवर माहितीपूर्ण सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

या सेमिनारमध्ये स्टडी स्मार्ट च्या व्यवस्थापकीय संचालकांचा सत्र प्रवेश प्रक्रिया, अभ्यास गणत्वे,अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती आणि निधीबद्दल माहिती देण्यात येणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी ज्या ज्या अडचणी येतात त्या या सेमिनाच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत तसेच या सेमिनारमध्ये अर्ज आणि शिष्यवृत्ती कार्यशाळा विद्यापीठाचा अर्ज आणि शिष्यवृत्ती संधीबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार असून त्याचप्रमाणे प्रमाणित सल्लागारांकडून वैयक्तिक असा सल्ला देण्यात येणार आहे आणि परदेशात अर्धवेळ नोकऱ्या निवासाबद्दल परदेशात कसे राहावे याबद्दल व्यवहारिक माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यात एक मास्टरक्लास आयोजित करत आहोत जो मास्टर ट्रेनर द्वारा संचालित केला जाईल, यासह एक आय इ एल टी एस मॉक टेस्ट’ आयोजित करू जी विद्यार्थ्यांना ‘आय इ एल टी एस परीक्षेचा अनुभव देईल. करिता विद्यार्थी आणि पालकांनी या सेमिनारसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे असे आव्हान स्टडी मार्ट चे मॅनेजिंग डायरेक्टर चेतन जैन यांनी केले आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news