Saturday, April 5, 2025

परभणी जिल्ह्यात जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात रिक्त पदे असल्याने आरोग्य सेवा देण्यात अडचण

Spread the love

परभणी जिल्ह्यात जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात रिक्त पदे असल्याने आरोग्य सेवा देण्यात अडचण

 

परभणी(प्रतिनिधी)सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय अंतर्गत रुग्णांना परिपूर्ण सेवा देण्यासाठी राष्ट्रीय कीटक जन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध पदे महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहेत.त्यापैकी महानगरपालिका परभणी अंतर्गत जीवशास्त्रज्ञपद, जिल्हा हिवताप कार्यालयातील अवैद्यकीय अधिकारी पद, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातील आरोग्य पर्यवेक्षक पद रिक्त आहे. ही पदे इतर वरिष्ठ लोकांना अतिरिक्त कार्यभार म्हणून दिली असती आज पर्यंत जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यात आली असती. परंतु वरिष्ठ अधिकारी यांना याच्याशी काहीही देणे घेणे नाही असे जाणवते. आरोग्य विभागातील पद रिक्त राहणे हा नेहमीचाच आजार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सामान्य लोकांना आरोग्य सेवा घेण्यात अडचण येते. सदरील रिक्त पद भरण्याची जबाबदारी प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रावजी सोनवणे आणि सहाय्यक संचालक हिवताप छत्रपती संभाजी नगर डॉ भंडारी मॅडम यांची आहे..पण अनेक दिवसापासून हे पद रिक्त असल्याने वरिष्ठ अधिकारी यांचे ह्याकडे दुर्लक्ष आहे असे जाणवत आहे. आरोग्यसेवा घेत असताना त्यांच्या दुर्लक्षाचा सामान्य रुग्णांना फटका बसत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे..उपलब्ध आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातून सेवाजेष्ठतेनुसार प्रथम महानगरपालिकेतील जीवशास्त्रज्ञ गट ब पदे भरणे अत्यंत आवश्यक आहे.त्यानंतर अवैद्यकीय आरोग्य अधिकारी हे जिल्हा हिवताप कार्यालयातील पद भरणे आवश्यक आहे . त्यानंतर जिल्हा क्षयरोग कार्यालयातील आरोग्य पर्यवेक्षक हे पद भरणे आवश्यक आहे. परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही पद रिक्त आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा सेवा भेटण्यात अत्यंत अडचण येत आहे.

परभणी जिल्ह्याचे नेहमीच दुःख आहे आरोग्य विभाग हा सामान्य जनतेसाठी काम न करता काही विशिष्ट अधिकाऱ्यांचे पोषण करण्यातच धन्यता मानतो. आरोग्य विभागाचे मूळ ध्येय हे सामान्य जनतेला आरोग्यसेवा देणे आहे याचा अनेक वेळेस आरोग्य अधिकाऱ्यांना सविस्तर विसर पडतो आणि अत्यंत दुर्दैवी आहे

_____________________________________________

______________________________________________

 जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय अंतर्गत महानगरपालिकेतील जीवशास्त्रज्ञ, अवैद्यकीय अधिकारी, व आरोग्य पर्यवेक्षक जिल्हा शहर कार्यालयातील त्वरित भरणे द्यावी अथवा माझ्या संघटनेमार्फत संविधानिक पद्धतीने लढा देण्यात येईल.-बाळासाहेब सुरवसे (राष्ट्रीय अध्यक्ष आरोग्य आरोग्य पर्यवेक्षक संघटना महाराष्ट्र)

- Advertisement -spot_img
Latest news
Related news