पाथरी(प्रतिनिधी)हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजे येथील तलाठ्याची भोसकून हत्या झाल्या प्रकरणी पाथरी तहसील मधील महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने वरिष्ठांना निवेदन देऊन एक दिवसाचे लक्षवेधी कामबंध आंदोलन करून निषेध करण्यात आला.
सविस्तर बातमी अशी की हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रणजी येथील तलाठी संतोष देवराव पवार यांची 28 ऑगस्ट रोजी दुपारी सज्जा कार्यालयात हत्याराने भोसकुन हत्या करण्यात आली या हत्येचा निषेध म्हणून पाथरी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना दी.२९ ऑगस्ट गुरुवार रोजी निवेदनाद्वारे सदरील तलाठी संतोष देवराळ पवार यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावे व त्याचबरोबर मयत तलाठी यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाची मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देऊन एक दिवशीय लक्षवेधी काम बंद आंदोलन करण्यात आले या निवेदनावर व्ही.एस.भराडे,केसकर आर.एस,जी.एल अन्नपुरे,सय्यद वसीम अक्रम,चव्हाण एम.बी,एम.ए.पुरणवाड, एस.पी.कांबळे,छाया भागवत,डी.एम.गवारे इत्यादींच्या दीलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.