Monday, July 21, 2025

पोलिस ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध करत नाहीत;एसपी साहेबांनी लक्ष घालावे ग्रामस्थांची अपेक्षा! गावातील अवैध दारू बाबात पोलिस पाटलांचे काही देणेघेणे नाही का?

Spread the love

सोनपेठ (प्रतिनिधी)तालुक्यातील ग्रामीण भागातील दारूचा परवाना नसताना देखील हातभट्टी, देशी-विदेशी दारूची विक्री जोमात चालू आहे. तालुक्यातील ऊखळी बु.येथे तर दर चार -पाच घरानंतर विक्री चे दुकान आहे .तर तालुक्यातील सर्वात मोठी व नवाजली जाणारी गावे म्हणजे उखळी बुद्रुक, डिघोळ,नरवाडी करम,डिघोळ तांडा आदी गावांमध्ये दारू विक्रीचा परवाना नसताना देखील सर्रास दारू विक्री होत आहे.

गावातील अवैध दारू बाबात पोलिस पाटलांचे काही देणेघेणे नाही का? असेल तर तालुक्यातील पोलीस स्टेशन यांना कळविण्यात येत नाही असे म्हणावे अन्यथा स्थानिक प्रशासनासह पोलिसांचेही हाथ बरबटलेले आहेत नेमकं गौडबंगाल काय?असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.गावातील दुकानात दारूवर एकच गर्दी होत आहे. यामुळे गावातील महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दारुडे दारू पिऊन गावात हैदोस घालत असल्याने सामान्य माणसाला मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.वृध्द, शाळकरी , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दारुड्यांचा त्रास सोसावा लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रथम पदावर रुजू होऊन गावाचे नाव लौकिक केले आहे. परंतु जेव्हापासून गावात देशी व अवैध दारू (हातभट्टी)दारूचे दुकाने धाबे झाले तेव्हापासून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद झाली. आणि गावाचा विकास मंदावला आहे अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर अनेकांनी या दारूमुळे जगाचा शेवटचा निरोप घेतला परंतु या अवैध देशी दारूच्या दुकानाकडे पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने याकडे मात्र कानाडोळा केला आहे. अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा दारू बंद का होत नाही यामध्ये पोलिसांचाच हात आहे की काय असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. व देशी दारूचे दुकाने भर गावात असल्याने येथील शाळकरी विद्यार्थ्यांना याचा परिणाम होत आहे आणि दारुड्यांची संख्या मात्र, दिवसेंदिवस वाढत आहे दारूमुळे गावात भांडण तंटे वाढत आहेत दररोज एक ना एक भानगडी गावात होत असल्याने शांततेचा भंग होत आहे गावात अनेक राजकीय मोठमोठी पुढारी आहेत परंतु अद्याप गावात चालत असलेली देशी दारू बंद करण्यासाठी धजावले नाहीत.

ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रीबाबत जिल्हाधिकारी साहेबांना आदेश द्यावा लागेल का?एवढे निर्ढावलेले पोलिस प्रशासन कुण्याच्या दबावाखाली आहेत? असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत.

महामार्गावरील ढाब्यावर सर्रासपणे अवैध दारू विकली जाते. पोलिस प्रशासन नेमकी कारवाई करण्यास का धजावत नाही की यामागे काही धागेदोरे आहेत याचा तपास एसपी साहेबांनी करावा.यात पीआय आणि एसपी यांनी जातीने लक्ष घालावे.अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.तर आता जिल्हाधिकारी आणि एसपी साहेब यांच्यावर अवैध दारू विक्री बाबतीत आदेश मिळतील अशी सामान्य नागरिकांना आशा आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news