Saturday, April 5, 2025

प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ. आनंद बाविस्कर यांना पीएच.डी प्रदान

Spread the love

पाथरी (प्रतिनिधी)येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ. आनंद बाविस्कर यांना नवी दिल्ली येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश राजेश टंडन यांच्या हस्ते आयुर्वेद व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पीएच.डी प्रदान करण्यात आली.

एस एस ए युनिव्हर्सिटी पोर्टलैंड अमेरिका (USA) यांच्या वतीने आयुर्वेद व कायरो प्रॅक्टिक (chiropractic) व समाज कार्य या विषयावर ही पदवी डॉ. आनंद बाविस्कर यांना देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून डॉ. आनंद बाविस्कर हे पाथरी येथे आपला वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी अनेक दुर्धर आजार असणाऱ्या पेशंटला बरे केले आहे. त्यामुळे त्यांची मराठवाड्यात सर्वत्र ख्याती आहे.दिनांक 14 जुलै रोजी दिल्ली येथे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश राजेश टंडन खासदार व हिंदी सिनेमाचे अभिनेते मनोज तिवारी यांच्या पत्नी सौ सुरभी तिवारी,व नीलम युनिव्हर्सिटी चे वाइफ चान्सर शमीम अहमद,बार कौन्सिल ऑफ सुप्रीम कोर्ट चे सेक्रेटरी एडवोकेट रोहित पांडे,यांच्या हस्ते डॉक्टर बाविस्कर यांना पीएच.डी सन्मानपूर्वक देण्यात आली. त्यांना मिळालेल्या या सर्वोच्च पीएच.डी सन्मानाबद्दल डॉ.आंनद बाविस्कर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news