Sunday, July 20, 2025

भोगाव ग्राम पंचायत सपशेल नापास.. *दोन पिढ्यांपासून करावा लागतो उघड्यावरच अंत्यविधी* -करोडो रुपयांच्या विकास निधी पासुन बौध्द समाज अजूनही वंचितच -भोगाव येथील बौद्ध समाजाचे आता प्रशासनाला साकडे

Spread the love

प्रतिनिधी जिंतूर

(दि- 06/09)जिंतूर तालुक्यातील सर्व परिचित असणारे भोगाव देवी ग्रामपंचायत कार्यालय विकासाच्या बाबतीत पुढे असल्याचा बोलबाला सर्वत्र केल्या जातो मात्र गावातील बौद्ध समाजाला गेल्या दोन पिढ्यांपासून अंत्यविधी पार पाडण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने बौद्ध समाजाच्या व्यक्तींचा अंत्यविधी उघड्यावरच करावा लागतो. यामुळे भोगाव येथील करोडो रुपयांची विकासाची गंगा स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील दलित वस्ती कडे वळाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत आज गावकऱ्यांनी निवेदन देऊन आता प्रशासनाकडे स्मशानभूमी बांधकामाची मागणी केली आहे. अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील भोगाव हे जिल्हा परिषद निवडणुकीतील महत्त्वाचे सर्कल म्हणून बघितल्या जाते या सर्कलवर अनेकांची नजर आहे गावात 18 पगड जातीची माणसं वास्तव्य करतात सर्व समाजासाठी मूलभूत सुविधा स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाने उपलब्ध करून दिले आहेत मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील गावातील बौद्ध समाजासाठी पक्के स्मशानभूमी शेड नसल्याने आजवरचे सर्व अंत्यविधी हे उघड्यावरच पार पाडले जात असल्याची तक्रार गावातील बौद्ध समाजातील नागरिकांनी केली आहे. दलित सिंचन भूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायतीला वारंवार विनंती केली होती परंतु केवळ आश्वासनाच्या बळवणीवर त्यांचे समाधान केले जात होते गावातील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी शेड नसल्यामुळे भर पावसात अंत्यविधी करणे शक्य नाही त्यामुळे पाऊस थांबेपर्यंत मृतदेह घरातच ठेवावा लागतो. पावसात अंत्यविधी करताना अर्धवट प्रेत जाळले जाते, अंत्यविधीला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही जाळण्यासाठी स्मशानभूमीचे शेड नाही त्यामुळे मृतदेहाची विटंबना होत आहे. असे सादर निवेदनात म्हटले आहे यावर तालुका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून स्मशानभूमी शेड संरक्षण भिंत सुशोभीकरण आणि स्मशानभूमी रस्ता तात्काळ मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी निवेदन सादर केले आहे. भविष्यात हा प्रश्न मार्गी न लागल्यास यापुढील अंत्यसंस्कार हे तहसील कार्यालय परिसरात करण्याचे देखील नागरिकांनी सुचित केले आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news