जागतिक पटलावर किंवा जगाच्या बरोबरीने आगेकूच करण्यासाठी एकत्रित येऊन एकमेकांना सहकार्य करून मानवाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी अनेक देश एकत्र येतात.त्यातून संघटना उभी राहते आणि सहकारी राष्ट्रांना त्यांच्या एकमेकांच्या कमीअधिक शक्तीचा वापर करता येतो.ही भुमिका या सर्व संघटनांची असते. जगातील कोणताच देश प्रगतीपासून वंचित राहता कामा नये.ही भुमिका महत्वाची असते.भारत तर सुरवातीपासून वसुधैव कुटंबकमची संकल्पना घेऊन पुढे येत आहे.हीच संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जगातील इतर राष्ट्रांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी जागतिक पातळीवरील अश्या संघटना कामी येतात.जसे सार्क संघटना, जी २० संघटना अशाप्रकारच्या संघटनांमध्ये विविध देशाची भुमिका लक्षात घेऊन, जगातील सर्वात मोठ्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने जगातील सर्वंच देशांत विकास साधता येईल. त्यासाठी या संघटना कामी येतात.त्यातून व्यापक विचार पुढे येतो आणि देशांचा पाठिंबा मिळाल्याने संयुक्त राष्ट्र संघटनेतील सर्व राष्ट्रे त्या दिशेने पाऊल टाकू शकतात. त्यामुळे अशा भौगोलिक विभागानुसार आंतरराष्ट्रीय संघटना आवश्यक आहेत. त्यातील अशीच एक संघटना म्हणजे आसियान संघटना. आसियान ही अग्नेय आशियातील १० देशांची संघटना आहे. आसियान म्हणजेच, दक्षिण-पूर्व आशियाई देशांची संघटना यात ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश येतात. याचे सचिवालय जकार्ता येथे आहे.८ ऑगस्ट १९६७ रोजी ही संघटना स्थापन करण्याची घोषणा झाली, यालाच “बॅकाॅक घोषणा” म्हणतात.
२५ जानेवारी २०१८ रोजी भारत आसियान संबंधाला २५ वर्ष पूर्ण झाली तेव्हा २५ व्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा केला होता .या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या विशेष शिखर परिषदेची संकल्पना होती “समान मूल्ये, समान प्राक्तन’ . आसियान – भारत संवाद संबंधांना, उचित तत्वे, उद्दिष्ट, एकत्रित मूल्ये आणि संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेली मूल्ये, दक्षिण- पूर्व आशियात सहकार्याविषयीचा करार, परस्पर फायद्याच्या संबंधांवर आधारित पूर्व आशिया शिखर परिषदेतील तत्वे, आसियान-भारत संबंधांना २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर आयोजित शिखर परिषदेत स्वीकारण्यात आलेला जाहीरनामा आणि आसियान परिषदेचा मूळ जाहीरनामा आणि स्वरूप या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध होतात.भारत आणि दक्षिणपूर्व आशियाई देशातील सांकृतिक आदानप्रदान तसेच सांस्कृतिक- नागरी बंध गेल्या अनेक शतकांपासून कायम असून आसियान आणि भारत संबंधांचा दृढ पाया या बंधांमुळेच रचला गेला आहे, हे आम्ही इथे विशेषत्वाने नमूद करतो. आसियान – भारत संवाद संबंधांत गेल्या २५ वर्षात झालेली प्रगती आणि मिळालेले यश लक्षणीय असून आसियान समूहाचे तीन आधारस्तंभ, राजकीय-सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक वाटचाल, या सर्व क्षेत्रात दोघांनीही गाठलेला पल्ला वाखाणण्याजोगा आहे.शांतता, प्रगती आणि एकत्रित समृद्धीसाठी आसियान भारत भागीदारीचा कृती आराखडा २०१६-२०२० या वर्षांसाठी स्वीकारण्यात आला असून या आराखड्यातील कार्यक्रमाची अंमलबजावणी समाधानकारकरीत्या सुरु असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्याशिवाय या आराखड्यातील कार्यक्रमात निश्चित करण्यात आलेल्या कामांची २०१६-१८ साठी प्राधान्यक्रमानुसार यादीही बनवण्यात आली आहे. प्रादेशिक संरचनेत आसियानच्या मध्यवर्ती भूमिकेला भारताने वेळोवेळी दिलेला पाठींबा आणि आसियान प्रदेशात शांतता, सुरक्षितता आणि समृद्धी नांदावी यासाठी आसियान देत असलेल्या योगदानाला भारताचे सातत्यपूर्ण सहकार्य याचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. आसियान: च्या अंमलबजावणीसाठी, विशेषतः एकत्र वाटचाल. आसियान देशांमधील संपर्क वाढवणे, आणि आसियान एकीकृत कृती आराखडा ३ साठी भारत देत असलेल्या सहकार्याबद्दल आसियान समूहाने कौतुक व्यक्त केले आहे.२०१७ या वर्षभरात आणि २०१८ च्या सुरुवातीला भारत आणि आसियान सदस्य देशांत झालेले विविध उपक्रम अत्यंत स्तुत्य होते. या उपक्रमांमुळे भारत-आसियान राजनैतिक भागीदारी, दोन्ही समुदायाला एका विशिष्ट स्तरापर्यंत विस्तारण्यात मदत झाली. विशेषतः आसियान-भारत युवा शिखर परिषद, आसियान- भारत युवा पुरस्कार आणि युवा नेतृत्व कार्यक्रम, आसियान-भारत संगीत महोत्सव अशा उल्लेखनीय उपक्रमांमुळे परस्पर संबंध अधिकच दृढ झाले. असे एकमेकांत संस्कृती, शिक्षण, वारसा याची देवाणघेवाण यानिमित्ताने होते आणि त्यातून वसुधैव कुटंबकमच्या कल्पना वास्तवात येण्यास मदत होते.यासाठी काही करार किंवा आयात – निर्यात करावीच लागते अशातला भाग नाही.पण, व्यापार उदीम वाढविण्यासाठी ते प्रयत्न सुध्दा तितकेच महत्वाचे आहे.
– पदमाकर उखळीकर ,
मो.९६३७६७९५४२ .