Saturday, April 5, 2025

महसूल कर्मचारी व पोलीस अधिकारी निवडणूक कामात व्यस्त; गौण खनिज माफी यांची वाळू व मुरूम चोरी रात्रीच्या वेळी चालू आहे मस्त. तालुक्यातील गोंडगाव येथून अवैध वाळू उपसा वाहतूक तर जायकवाडी डावा कालव्यावरील मुरुमाचे उत्खनन व वाहतूक चोरट्या मार्गाने सुरू

Spread the love

पाथरी(लक्ष्मण उजगरे) विधानसभा निवडणूक कामांमध्ये पाथरी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील मधील कर्मचारी व पोलीस कर्मचारी व्यस्त असताना तालुक्यात रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा व वाहतूक त्याचबरोबर अवैध मुरुमाचे उत्खनन व वाहतूक रात्रीच्या वेळी अधिकारी कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत चोरट्या मार्गाने सुरू असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून अवैध रेती उपसा व अवैध मुरूमाचे उत्खनन करणाऱ्या माफियांवर वेळीच कारवाई करण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वृत्त असे की, एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना निवडणूक कामांमध्ये पाथरी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय पोलीस प्रशासन व्यस्त असताना पाथरी तालुक्यातील गौडगाव येथून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर पाथरी तालुक्यातील जाणारा जायकवाडीच्या डाव्या कालव्यालगत असलेला मुरूम अवैध रित्या उत्खनन करून तो रात्रीच्या वेळी वाहतूक करत शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचे काम रात्रीच्या वेळी होणाऱ्या अवैध वाळू उपसा अवैध वाहतुक व अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकी मधून होत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असून सदरील वाळूमाफिया व मुरूम माफिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त वेळीच करण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news