परभणी ता.27(प्रतीनीधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची छत्रपती संभाजी नगरात भेट घेतली असुन आज दुपारी दोन वाजता “राष्ट्रवादी’च्या शरदचंद्र पवार गटात अधिकृत प्रवेश केला असल्याची पोस्ट स्वतः मा.आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी समाज माध्यमांवर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष माजी आमदार दुर्राणी या दोघात गुरुवारी रात्री पाथरीत बंद दरवाज्याआड चर्चा झाली होती.
प्रदेशाध्यक्ष पाटील हे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या संवाद साधण्याच्या निमित्याने गुरुवारी रात्री परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाले; तेव्हा त्याचे पाथरीत माजी आमदार दुर्राणी यांनी जोरदार स्वागत केले. दुर्राणी यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या या स्वागत सोहळ्यास मोठ्या संख्येने समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते. स्वागताच्या सोहळ्यानंतर स्नेहभोजन, पाठोपाठ या दोघात बंद दरवाज्याआड चर्चासुध्दा झाली, त्या चर्चेबद्दल दोघांनीही अधिकृत अशी माहिती दिली नाही.परंतु माजी आमदार दुर्रानी हे विधान परिषदेवर पुन्हा वर्णी न लागल्याने उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर नाराज असल्याने,त्या नाराजीतूनच ते राष्ट्रवादीच्या शरदचंद्र गटात म्हणजेच स्वगृही आज परत जाणार आहेत. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या समावेत दुर्राणी यांनी प्रवेशपूर्व चर्चा केली असावी असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत होते.
दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील दौऱ्या दरम्यान माजी आमदार दुर्रानी हे त्यांची भेट घेतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता.अपेक्षेप्रमाणे दुराणी यांनी ज्येष्ठ नेते पवार यांची आज भेट घेऊन राष्ट्रवादीच्या पवार गटात आज दुपारी संभाजीनगर येथे अधिकृत-रित्या प्रवेश केल असल्याचे आ.दुर्राणी यांनी त्यांच्या स्वतःच्या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे.