पाथरी (लक्ष्मण उजगरे) शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्तम काम करणारे पाथरी बाजार समीतीचे संचालक मंडळाला राजकीय घडामोडीनंतर संघर्षाची झालर लागली.सोमवारी गणपुर्ती अभावी तहकूब झालेली संचालक मंडळाची सभा गुरूवारी झाली खरी पण राजकीय हितापोटी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या १२ संचालकांनी नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केद्र सुरु करण्याच्या शेतकरी हिताच्या निर्णयालाच विरोध केला.खरेतरं हा प्रकार बाजार समीती कायद्याची एकप्रकारे ‘थट्टा’ च म्हणावी लागेल. शेतकरी अशा संचालक मंडळाकडून काय आदर्श घेतील असा प्रश्न या बैठकीनंतर पुढे आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदाने स्थानिक राजकारण ढवळून निघाले.पाथरीत बदलत्या राजकीय स्थितीत पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी माजी आ.बाबाजाणी दुर्राणी यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेवर विश्वास ठेवून आपली भुमीका कायम ठेवली.पण हा प्रकार माजी आ.दुर्राणी यांना जिव्हारी लागला.या राजकीय घडामोडीनंतर सोमवारी पहिल्यांदा बाजार समीतीची सभा हेतूपुरस्पर गणपुर्ती अभावी तहकूब झाली.त्यानंतर गुरुवारी १२ सप्टेंबर दुपारी १ वा.सभागृहात सभापती अनिल नखाते यांचे अध्यक्षतेखाली सभा घेतली.यावेळी सभापती व विरोधी गटाचे ५ असे ६ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे १२ पैकी १२ असे १८ संचालक उपस्थिती होते.
यावेळी सभापती अनिल नखाते यांनी शासनाने नाफेड मार्फत बाजार समीतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी जिल्हा पणण अधिकारी यांचेकडे प्रस्ताव देऊन मंजुरी घ्यावी.जेणेकरून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ असा शासनाचा हमी भाव मिळेल कारण खुल्या बाजारात असा भाव मिळणे मुश्किल आहे. या प्रस्तावास संचालक प्रभाकर शिंदे यांनी अनुमोदन दिले.परंतू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे १२ संचालकांनी विरोध केला.
याशिवाय सभापती नखाते यांनी शेतमाल तारण योजना अंतर्गत कृषी पणन मंडळाकडून १० लाख अँग्रीम घेऊन ते शेतकऱ्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मांडला.यास संचालक एकनाथ घांडगे यांनी अनुमोदन दिले यालाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या १२ संचालकांनी विरोध केला.यानंतर बाजार समीती अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार सप्टेंबर अखेर सर्वसाधारण सभा घेण बंधनकारक आहे. हि सभा ३० सप्टेंबर रोजी घेण्यात यावी असा प्रस्ताव सभापती नखाते यांनी मांडला.यास अशोकराव गिराम यांनी अनुमोदन दिले.परंतु शरदचंद्र पवार गटाच्या १२ संचालकांनी याला विरोध केला त्यामुळे सर्वसाधारण सभा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बैठकीत सभापती अनिल नखाते,संचालक ,प्रभाकर शिंदे,एकनाथ घांडगे,अशोकराव गिराम,संतोष गलबे,किरण टाकळकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाला संमती दिली.पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या १२ संचालकांनी विरोध केल्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय तुर्तास मंजुर होऊ शकले नाही .
———————————————————————
राजकीय घडामोडीनंतर असे प्रकार होत राहतील
पण समाजकारण आणि सामाजिक बांधीलकीतून शेतकरी हिताच्या निर्णयाला खोडा घालतील असे वाटले नव्हते.
अनिल नखाते
सभापती, कृऊबास पाथरी
——————————————————————————————————————————————
सभापतींनी स्वतःकंपनीचा फायदा करायचा होता;हे आत्ता आमच्या लक्षात आले आहे-शाम धर्मे(कृ.उ.बा.उपसभापती)
मा.सभापती महोदय यांना माझा प्रश्न आहे की शेतकऱ्या विषयी व त्यांच्या माला विषयी एवढा कनवळा होता तर २०१८ पासुन नाफेड खरेदी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे.मग त्यांनी मागिल २०१८ पासुन नाफेडचे केंद्र का घेतले नाही .कारण त्यांना स्वतःच्या कंपनीवर नाफेडचे केंद्र चालवायचे होते व स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता .त्यांनी स्वतःच्या वाल्मिकेश्वर ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि .यांचा प्रस्ताव महाएफपिसी पुणे येथे गेल्या दोन तीन वर्षापासून देत आहेत म्हणून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव दिला नाही .यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही घेणेदेणे नाही ते फक्त स्वतःसाठी हे काम करीत असतात.
——————————————————————————————————————————————
सभापतींच्या विरोधात बारा संचालक असताना सभापती बैठक कशी घेवु शकतात;त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा-रोहीणी विष्णु काळे(कृ.उ.बा.संचालक)
मागिल आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समीतीची मासिक बैठक घेण्यात आली त्या बैठकीस बारा संचालक उपस्थित राहीले नाही.तरीही ते बैठक कशी घेवु शकतात याचा खुलासा सभापती अनील नखाते यांनी करावा .त्याचबरोबर बैठकीस उपस्थित न राहणे याची अनेक कारणे आहेत.जाहीरम्याम्यामध्ये दील्याप्रमाने शेतकऱ्यांना १० जेवन,शुध्द पाण्याची व्यवस्था,मार्केट यार्डातील स्वच्छता,ग्रामीण भागातुन आलेल्या शेतकऱ्यांना निवारा(आराम)करण्यासाठीची इत्यादी बाबी पुर्ण न केल्यामुळे बारा संचालक सदरील बैठकीला उपस्थित राहीले नाही.शेतकऱ्यांनी सांगावे कोण शेतकरी विरोधी आहे.सभापती की संचालक?म्हणुनच सभापती यांनी बारा संचालक बैठकीला अनुपस्थित राहीले.याच्या अर्थ स्वतः समजून घेत त्यांनी राजीनामा द्यावा.