पाथरी (प्रतिनिधी)तालुका हा अवैध वाळू उपस्यासाठी ओळखला जाणारा तालुका आहे.कारण पाथरी तालुक्यामध्ये गोदावरी नदीचे पात्र मोठे असून सदरील महसुलाचे वरिष्ठ अधिकारी यांची तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा पाहता मुखसंमती असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर बातमी अशी की पाथरी तालुक्यातील पाटोदा ते मुद्गल पर्यंत असे गोदावरी नदीचे पात्र असून सध्याच्या काळामध्ये गोदावरी नदीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी असल्याने त्या ठिकाण अत्याधुनिक मशीन व केणीच्या,तराफ्याच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू आहे.
त्यामध्ये पाटोदा मरडसगाव,गुंज,उमरा,गोंडगाव, मुदगल,लिंबा आनंदनगर तांडा इत्यादी ठिकाणी वाळू उपसा मागील 15 ते 20 दिवसापासून शेकडो ब्रास वाळूचा उपसा चालू असताना पाथरी महसूल गौण खनिज विभागाकडून कुठलीही मोठी कारवाई अद्याप तरी झालेली नाही.
पाथरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या वाळूची वाहतूक रात्रीच्या वेळी हायवा,टिप्पर,ट्रक,407 च्या साह्याने खुलेआम सायकांळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सुळसुळाट असताना या वाहनांवर मात्र कारवाई न करता पाथरी महसूल प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वी दोन ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली.असून रात्रीच्या वेळी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या अवैध वाळु वाहतुक हायवा,ट्रक, टिप्पर यांच्यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.?
लवकरच वाचा- वाळू माफियांकडून हप्ते वसूल करणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण?