हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची आज जयंती . २९ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या अलौकीक खेळाचे कौतुक आणि सन्मान म्हणून दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून हा दिवस कौतुकास्पद. खेळाडुंचा आदर , कौतुक, सन्मान करणारा दिवस पण फक्त क्रिकेटर्सचा नव्हे हे मुद्दामहून सांगतो.ध्यानचंद यांचा जन्म २९ आँगस्ट १९०५ साली उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडील सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटिश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. त्यामुळे मेजर ध्यानचंद सारखा जादूगार आपल्याला मिळाला असावा. ध्यानचंद सिंग मैदानावर गोल करीत असताना गोल कधी झाला हे सुद्धा कळायचे जणू काही जादूच झाली असावी. एवढं खेळातील कौशल्य मेजर ध्यानचंद यांच्या खेळात होते. ज्या खेळाचे कौतुक हिटलर शब्द आपण ऐकतो पण त्याच हिटलरने केले.जो जर्मनीचा शासक होता.तेव्हा भारत पारतंत्र्यात होता.ध्यानचंद यांनी १९२६ ते १९४८ दरम्यान ४०० हून अधिक सामने खेळले. यात त्यांनी जवळपास १००० गोल डागण्याचा पराक्रम केलाय. हॉकीच्या मैदानात अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी २०१२ पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा घेतलेला निर्णय हा भारतीय खेळाडूंचा सन्मानाचा दिवस . तत्कालीन केंद्रातील युपीए सरकारने क्रिडा दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
ध्यानचंद सिंग हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला १९२८,१९३२ व १९३६ मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा. ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली.यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाची थीम ‘ शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाच्या प्रचारासाठी खेळ’ ही आहे. ‘ ही थीम ठळकपणे दर्शवते की खेळ लोकांना कसे एकत्र आणू शकतात, समजूतदारपणा वाढवू शकतात आणि मजबूत समुदाय कसे तयार करू शकतात. खेळ सांघिक कार्य, आदर आणि ऐक्याला प्रोत्साहन देतात, सामाजिक अडथळे दूर करण्यास मदत करतात.तसेच आपुलकी निर्माण करणारा खेळ देशादेशात आणि अंतर्गत एकतेची भावना निर्माण करतो.देशाला निरोगी राहण्यासाठी खेळ हा मदत करतो.
ग्रीस या देशात क्रीडा प्रकारांना विशेष महत्व दिले जाते. इसवी सन पूर्व आठव्या शतकात ग्रीसमध्ये या खेळांची ऑलिंपिक सुरुवात झाल्याचा इतिहास आहे. दर चार वर्षांनी तेथे होणाऱ्या स्पर्धेत विविध खेळाडू सहभाग घेत असत. खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली.ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत ती अमेरिका या देशाने म्हणजे ऑलिंपिक खेळांमध्ये सुध्दा अमेरिका महासत्ता आहे.अमेरिकन खेळाडूंनी उन्हाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये एकूण २७६४ पदके त्यापैकी ११०५ सुवर्ण जिंकली आहेत आणि हिवाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये आणखी ३३० त्यापैकी ११४ सुवर्ण जिंकली आहेत, ज्यामुळे युनायटेड स्टेट्स इतिहासातील सर्वात जास्त पदक जिंकणारे राष्ट्र बनले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या बाबतीत कोणताही देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या अंतरावरही नाही. एकूणच, अमेरिकेने उन्हाळी आणि हिवाळी खेळांमध्ये एकत्रितपणे सर्वाधिक ३१०५ पदके जिंकली आहेत . फक्त उन्हाळी ऑलिंपिकमध्ये, यूएसएने २६५५ पदके जिंकली आहेत, जी सर्व देशांमधील सर्वोच्च आहे.उन्हाळी ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके १०७० जिंकण्याचा विक्रम यूएसएच्या नावावर आहे, त्यानंतर सोव्हिएत युनियन ३९५ आणि ग्रेट ब्रिटन २९२ यांचा क्रमांक लागतो.
उन्हाळी आणि हिवाळी खेळ एकत्र करून, जर्मनी १२११ पदकांसह ३८४ सुवर्ण यूएसए मागे दुसऱ्या स्थानावर आहे, तर सोव्हिएत युनियन एकूण १२०४ तर ४७३ सुवर्ण सह तिसऱ्या स्थानावर आहे.आपण मात्र ७१ व्या स्थानावर आहोत ज्याच्या स्वातंत्र्याची नुकतीच पंचाहत्तरी ओलांडली निदान त्या स्थानावर नाही.असो आपण लोकसंख्येत जगात अव्वल आहोत एवढा विक्रम आपल्या नावावर तरी आहे.पण यापेक्षा हॉकी मध्ये तरी आपली सुरुवात आजवरच्या हॉकी खेळांमध्ये इतिहासात नोंद घेण्यासारखी ती मेजर ध्यानचंद यांच्या जादूई खेळामुळे. ऑलिम्पिक खेळ हे जगातील प्रतिष्ठेचे खेळ आणि ओळख निर्माण करून देतात.मात्र,त्या स्पर्धेत खेळाडू निर्माण करण्यासाठी हवे तेवढे प्रयत्न अजूनही दिसत नाही,जेवढे प्रयत्न आपण लोकसंख्येत एक नंबर येण्यासाठी केले. भारतीय पुरुष हॉकी संघाने एकूण आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत , त्यापैकी सहा सलग १९२८-१९५६ पर्यंत आणि टोकियो १९६४ आणि मॉस्को १९८० मध्ये आणखी दोन मिळवले. ऑलिम्पिक खेळ हे उन्हाळी ऑलिम्पिक खेळ आणि हिवाळी ऑलिंपिक खेळ प्रत्येक चार वर्षांनी आयोजित केले जातात. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये एकूण २६ पदके मिळविली आहेत, त्यापैकी सर्वात जास्त ११ पदके हॉकी मध्ये आहेत.ही विशेष बाब. याचे श्रेय ध्यानचंद यांना जाते.
भारतीय क्रीडा प्राधिकरण ही भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा संस्था आहे, ज्याची स्थापना भारतातील खेळाच्या विकासासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने १९८२ मध्ये केली होती.त्यालाच आता स्पोर्ट्स इंडिया म्हणून ओळखला जातो. २ क्रीडा शैक्षणिक संस्था, ११ प्रादेशिक केंद्रे १४ सेंटर्स ऑफ एक्सलन्स ५६ “क्रीडा प्रशिक्षण केंद्र” आणि २० विशेष क्षेत्रीय खेळ आहेत.यांची संख्या वाढवून प्रत्येक राज्यात केली पाहिजे तर आपण लोकसंख्येच्या प्रमाणात खेळांमध्ये अव्वल असू.
– पदमाकर उखळीकर ,
मो.९९७५१८८९१२ .