महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेलं आहे की, तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला फळप्राप्तीही त्या पद्धतीनेच मिळेल .जीवनामध्ये चांगले कर्म केले. चांगलं कार्य केलं की त्या कार्याची दखल देखील चांगल्या पद्धतीने घेतली जाते. आपल्या कार्याची हवा सर्व जगभर होते .जी माणसं सत्कार्य करतात. चांगली कार्य करतात ,समाजाच्या हिताची, समाजाच्या भल्यासाठी, समाजाला परिवर्तनवादी विचारधारा देण्याचे काम करतात ,समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करतात .असेच कार्य करणाऱ्या भीमयुगकार, अनेक पुरस्कार प्राप्त रानबा गायकवाड यांना अभिरा फाउंडेशन महाराष्ट्र यांचा लोककवी, महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
समाजातल्या तळागाळातल्या वंचित बहुजन माणसाला वर उचलण्यासाठी प्रयत्न करतात. अशा माणसांचा गौरव, सत्कार, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना योग्य सन्मान देण्याचे काम या समाजातील अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते करत आलेले आहेत. ज्यांना नुकताच अभिरा फाउंडेशनचा लोककवी वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.आमचे आदरणीय मित्र रानबा गायकवाड यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
रानबा गायकवाड यांची दणका वात्रटिका संग्रह ,साड्यासारखा माणूस, क्रांतीसूर्याच्या दिशेने हा विद्रोही कविता संग्रह,आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात हा महत्वपूर्ण ग्रंथ,तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला कुत्र्याची अंडी हा कथासंग्रह ही पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. तर आंबेडकरी चळवळीला आयाम देणारे , क्रांतिकारी आंबेडकरवादी नाटक भीमयुग ,फोटोसेशन, झुकती है दुनिया, लाजायचं नायं, झेडपीचे सर अन् कामं ढीगभर हे नाटके तर पाण्याखालचं पाणी, माईंड इट, फायनल तिकीट, हे त्यांचे गाजलेले लघु चित्रपट आहेत. याबरोबरच अनेक दर्जेदार कथा, कविता, लेख प्रकाशित झालेले आहेत. साहित्य क्षेत्राबरोबर एक नामवंत व्याख्याता म्हणूनही त्यांची ख्याती आहे.
त्यांना मिळालेला हा पुरस्कार खरोखरच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मिळालेला हा पुरस्कार आहे. थोर साहित्यिक, लेखक, दिग्दर्शक नाटककार अशा अनेक पातळीवर कार्य करणारे व रात्र दिवस समाजाच्या हितासाठी आपल्या लेखणीचा वापर करणारे, अन्याय, अत्याचार, समाजातील वाईट चालीरीती, परंपरा यांच्यावर वज्रघात घालणारी, सर्वसामान्य, गोरगरीब माणसावर अन्याय अत्याचार करणाऱ्या बांडगुळांची बोलती बंद करण्याचे काम करणारे लेखन त्यांनी केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान क्रांतिकारी बंडखोर विचाराने प्रेरित होऊन या समाजाला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व सर्व क्षेत्रांमध्ये प्रगत करण्यासाठी जी सामाजिक न्यायाची, हक्काची, मानवाला मानवाच्या दास्यातून मुक्त करण्याची चळवळ निर्माण झाली .या चळवळीने बहुजन समाजाला एक दिशा देण्याचे काम केलं .
घराघरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन हजारो युवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान लढ्यामध्ये सक्रिय झाले. येथील दलित समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठी प्रत्येक माणूस या विचारप्रवाहामध्ये सामील होण्याचं काम करू लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बंडखोर विचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम केलं .तो विचार अनेक लोक आपल्या लेखणीतून, आपल्या साहित्यातून, आपल्या कवितेतून, आपल्या नाटकातून व्यक्त करू लागली .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार इथल्या साहित्यिक, विचारवंत, लेखक, पत्रकार या लोकांनी देखील आपापल्या पद्धतीने समाजामध्ये पोहोचवण्याचं काम सुरू केलं.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारधारेतून मराठी साहित्यामध्ये आपल्यावरील अन्याय अत्याचाराला कृतीतून उत्तर देण्यासाठी, आपण जे काही भोगले ते सत्यात मांडण्यासाठी एक दलित साहित्य नावाचा विद्रोहाचा बॉम्ब निर्माण झाला. काल्पनिक विश्वात रममाण होण्यापेक्षा वास्तववादी लेखनावर आपण जे भोगले आपल्यावर जो अन्यायअत्याचार झाला आहे तो आपण प्रखरपणे न भिता न घाबरता लिहिण्याचं काम या लेखकांनी केलं .
यातून दलित साहित्याची निर्मिती झाली या दलित साहित्याने या समाजाला जागृत करण्याचं काम केलं. अनेक लोकांनी आपल्या बंडखोर क्रांतिकारी विचारधारेने लेखणीने या समाजाच्या परिवर्तनाला योग्य दिशा देण्याचे काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवी विचारधारेचे समर्थन करून तळागाळातल्या माणसांमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण केली. या दलित साहित्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कार्याची, त्यांच्या संपूर्ण जीवनाची प्रचंड पकड या दलित साहित्यिकांवर आहे. दलितांची अस्मिता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षापासून गुलामगिरीच्या खाईत खितपत पडलेल्या या बहुजन समाजाला, दलित समाजाला कोणतीही रक्तरंजित क्रांती न करता आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक लढ्यांच्या माध्यमातून इथली जातीय व्यवस्था मातीत घालण्यासाठी अथक परिश्रम केले.
या समाजाला मानवी दशातून मुक्त करून मानव बनवण्याचं काम केलं. त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा पगडा प्रत्येक दलित माणसाच्या, दलित विचारधारी माणसावर पडलेला आहे .दलित साहित्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा आपत्य आहे .आणि या साहित्याची नाळ प्रत्येक साहित्यिकांनी दलित माणसाने जोडण्याचं काम केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अनेक माणसांनी आपापल्या पद्धतीने या समाजामध्ये पसरण्याचं काम केलेला आहे. हेच कार्य अनेक वर्षांपासून सिद्धार्थ नगरच्या झोपडपट्टी मधून सुरू करून, भारतीय दलित पॅंथरच्या वादळाला आपलं जीवन समर्पित करून, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात योगदान देऊन, आपलं जीवन हे खरोखरच समाजासाठी चंदनासारखे जळण्याचे काम करून, आपल्या आई-वडिलांनी फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळीचा जो रथ हाकण्याचं काम केलं आहे. त्या रथाला पुढे नेण्यासाठी रानबा गायकवाड काम करत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशाल आपल्या हाती घेऊन, जातीयवादी ,धर्मवादी, कर्मकांडवादी, मानवाची मानवी मूल्य पायदळी तूढवणाऱ्या जात्यांध विचार धारेला जळण्यासाठी सक्रिय असलेला, अनेक वर्षापासून आपल्या लेखणीची तलवार रुपी धार येथील अन्याय अत्याचार करणाऱ्या विरुद्ध उभारण्याचे काम करणारा म्हणजे रानबा गायकवाड.अनेक वर्षापासून या समाज जीवनामध्ये चालत आलेल्या समाज विघातक वाईट चालीरीती, परंपरा, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध प्रहार करणारा. आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील अनेक वाईट प्रथा कायमचे निघून जाव्यात,आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून ,नाटकांच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडावे म्हणून विद्रोही व बंडखोर लिखाण करण्याचे काम करणारा. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ,लेखन शैलीच्या जोरावर ,पत्रकारितेच्या जोरावर ,नाटककार, दिग्दर्शक, समाजसेवक, अशा नाना प्रकारच्या भूमिका या समाजामध्ये वटवून या समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी रानबा गायकवाड यांनी वाहून घेतले आहे.
फुले आंबेडकरी चळवळ ही आपल्या नसानसामध्ये तेवत ठेवणारा. निस्वार्थीपणाने फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही प्रत्येक माणसाच्या घराघरांमध्ये पोहोचली पाहिजे. इथल्या बहुजन समाजाच्या लेकरांनी शिक्षणाच्या माध्यमातून वर गेले पाहिजे. शिक्षण ही दलित समाजाची भूक आहे. आणि शिक्षण प्रत्येक माणसाने घेऊन आपल्या जीवनाचे समाजाचे देशाचे कल्याण केलं पाहिजे .
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही जन माणसांमध्ये पसरण्यासाठी आपल्या साहित्याचा व विविध क्षेत्रात कार्य करून बाबासाहेबांची विचारधारा घराघरांमध्ये पोहोचण्याचा काम रानबा गायकवाड यांनी केलेला आहे.समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये सक्रिय सहभागी होऊन, आपल्या घरादाराची चिंता न करता समाजाची चिंता करून या समाजाला परिवर्तनाच्या दिशेने येण्याचे कार्य करीत आहेत.ते काम अविरतपणे चालू ठेवलेले आहे .या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत .अभिरा या संस्थेतर्फे मिळालेला लोककवी वामनदादा कर्डक जीवन गौरव हा पुरस्कार देखील फार तोलामोलाचा असा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे .
ज्या लोककवी वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पताका जलशातून, आपल्या शाहिरीतून, गायनातून महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. आपल्या शाहिरीतून जलशातून गाण्यातून समाज परिवर्तन निर्माण करण्याचे महान काम केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा तळागाळातल्या, वंचित, बहुजन, आदिवासी माणसापर्यंत प्रभावीपणे नेण्याचे काम केलं. त्या वामनदादा कर्डक यांच्या नावे असलेला पुरस्कार आदरणीय रानबा गायकवाड यांना मिळाला. हा पुरस्कार खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीस मिळालेला आहे .वामनदादांनी फुले शाहू आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपल्या शाहिरीतून, जलशातून, गाण्यातून समाजाच्या दांभिकते विरुद्ध प्रहार केला. त्याच पद्धतीने रानबा गायकवाड हे देखील फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून या समाजासाठी आपल्या हाडाची काड करून या समाजासाठी तन-धनाने विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत
अनेक वर्षापासून दलित समाजाला, दलित चळवळीला ते योगदान देण्याचे काम करत आलेले आहेत .अनेक वर्षापासून दलित समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उन्नतीसाठी ते तन मन धनाने कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा आवाका प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. ज्यांच्या आई-वडिलांनीच संपूर्ण हयात ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीला वाहिली होती. अत्यंत हलाखीच्या व गरिबीच्या परिस्थितीवर मात करून आज समाजामध्ये शून्यातून आपलं नाव निर्माण करणाऱ्या आदरणीय रानबा गायकवाड यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
त्यांना जीवनभर असेच अनेक पुरस्कार मिळत राहोत.या समाजासाठी, या समाजातील वंचित घटकासाठी आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून जी परिवर्तनाची लाट निर्माण केलेली आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महान विचार आपण या समाजाला समजावून सांगत आहात. हा विचार आपण तळहातावर फोडाप्रमाणे जपलेला आहे. आणि हाच विचार आपण अनेक वर्षापासून प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये पोहोचवण्यासाठी आपल्या लेखणीचा वापर करत आहात
आपलं कार्य खरोखरच महान आहे .आपण जे कार्य करत आलात या कार्याची दखल या समाजातील अनेक संस्थांनी घेतलेली आहे. आपलं कार्य असंच जोमात चालावं म्हणून अनेक पुरस्कर आपल्याला यानंतरही मिळत जातील. मिळणार आहेत. पण आदरणीय रानबा गायकवाड पुरस्कार मिळतच राहतात कार्य आपलं थांबवायचं नाही.
फुले शाहू आंबेडकरी चळवळीची विचारधारा टिकवण्यासाठी, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सक्रिय पहिल्या सारखंच राहिले पाहिजे. या जीवनामध्ये आपला हा जो सत्कार होतोय, आपल्याकडील पुरस्कारांची संख्या वाढते आहे.त्या आपल्या कार्याचा हा आढावा आहे .आपण समाजाला दिलेल्या योगदानचा आहे. आणि असंच योगदान आपण मरेपर्यंत समाजासाठी देत राहवे हीच अपेक्षा. जय भीम. जय प्रबुद्ध भारत.
एडवोकेट दिलीप उजगरे (परळी वैजनाथ)