पाथरी ( वार्ताहर ) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त सोमवारी पाथरी तालुक्यातील हादगाव बु येथे वृक्षारोपण, लाडकी बहिण योजना जनजागृतीसह विविध उपक्रम घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा जि. प.माजी उपाध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते ह्या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी ईश्वर पवार, कृषी विस्तार अधिकारी संदीपान घुंबरे ,सय्यद ,ग्रामविकास अधिकारी के.जी फंड ,क्लस्टर प्रमूख ढोबळे ,सरपंच बिबीषण नखाते, ग्रा.पं.सदस्य शे आशफाक ,प्रशांत नरवाते, बीटी कदम रामचंद्र नखाते ,सतीश नखाते यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी ग्रामपंचायत हादगांव बु अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते सार्वजणीक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.याशिवाय कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत लाभार्थी महिला अर्ज भरून घेणे व मार्गदर्शन केले.बचतगटांना कर्जवाटप धनादेश दिले, ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते व नाली बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला ,हर घर जल ,आयुष्यमान भारत, ईतर योजनांचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमस्थळी बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादन यांचे विक्री स्टॉल लावले होते.यावेळी बचतगट महिला अंगणवाडी ताई व ईतर महिला यांची मोठया प्रमाणावर उपस्थीती होती.यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.