पाथरी( लक्ष्मण उजगरे):पाथरी येथील शरदचंद्रजी पवार उर्दु प्राथमिक शाळेत यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थांच्या वतीने आनेक प्रयोग सादर करण्यात आले होते या वेळी समाज सेवक शहजाद लाला यांच्या वतीने विद्यार्थांना प्रोसाहन म्हणुन १०००० रु.चे रोख बक्षिस देण्यात आले या प्रसंगी आनेक मान्यवरांच्या उपस्थीतीत यंदाचे विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. सविस्तर वृत्त आसे कि शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा जवाहर नगर पाथरी येथे यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचे दि.१५/०१/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले होत या कार्यक्रमाचे उदघाटक व अध्यक्ष म्हणुन अब्दुल हबीब अंन्सारी तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी एम.बी.राठोड तसेच शहजाद लाला (भैय्या)ज्येष्ठ समाजसेवक आदी उपस्थीत होते तर ग्रामपंचायत देवनांद्राचे हाजी निसार अन्सारी, सोसायटी सदस्य जुम्मा खान पी. एस.सी.सदस्य,मुख्यध्यापक वसिम अंन्सारी,हातिम अंसारी सोसायटी सदस्य अब्दुल लतीफ अन्सारी उपाध्यक्ष सोसायटी आदी उपस्थित होते .
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थांच्या वतीने आनेक प्रयोग सादर करत मान्यवरांचे लक्ष वेधुन घेतले आसता गटशिक्षण अधिकारी राठोड यांनी विद्यार्थांचे कौतुक केले तर समाज सेवक शहजाद लाला यांनी विद्यार्थांना प्रोसाहन म्हणुन १००००/रु.चे रोख बक्षिस दिले हे बक्षिस मिळाल्याने विद्यार्थांच्या चहर्यावर वेगळाच आनंद दिसुन आला या प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना रियाउद्दीन शेख यांनी केली सदर विज्ञान प्रदर्शन संपन्न करण्यासाठी शिक्षक मोहम्मद जुनेद अंन्सारी,अंन्सारी अनिक,जाकीर अंन्सारी,कैसर खुरेशी,सईद,सुमय्या सिध्दीकी यांना परिश्रम घेतला विज्ञान प्रदर्शन मध्ये नवीन नवीन उपक्रम व ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले या प्रसंगी विद्यार्थी,पालक या सह परिसरातील आनेक नागरीक उपस्थीत होते