पाथरी(प्रतीनीधी)आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार असून ही यात्रा लवकरच पाथरीत येणार असल्याचे मा.आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले असून या यात्रेत हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक बाबाजानी दुर्राणी यांनी केले आहे.
सविस्तर बातमी अशी की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा 17 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पाथरी तालुक्यात येणार असून या यात्रेचा पाथरीमध्ये जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी स्वागत होणार असून या यात्रेमध्ये प्रामुख्याने मा.ना.जयंत पाटील,खा.सुप्रिया सुळे,खा.अमोल कोल्हे हे उपस्थित राहणार असून जिल्हा परिषद मैदान पाथरी या ठिकाणी जाहीर सभा होणार असल्याची माहिती यात्रेचे आयोजक बाबाजानी दुर्रानी यांनी एका बैठकी जाहीर केले असून 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेस जिल्हाभरासह पाथरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाबाजानी दुर्राणी यांनी केले आहे.