Saturday, April 5, 2025

शेतात काम करणाऱ्या बौद्ध महिलेस सरपंच पतीकडून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण आरोपी विरुद्ध अट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल

Spread the love

शेतात काम करणाऱ्या बौद्ध महिलेस सरपंच पतीकडून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

आरोपी विरुद्ध अट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल

परळी(प्रतिनिधी)स्वतःच्या शेतात काम करणाऱ्या बौद्ध महिलेस जातीवाचक शिवीगाळ करीत लाथा बुक्याने मारहाण करणाऱ्या परळी तालुक्यातील इंजेगाव येथील सरपंच पतीसह इतरांविरुद्ध अट्रोसिटी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी फिर्यादी सखुबाई यशवंत सोनवणे यांनी केले आहे. या घटनेने आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील इंजेगाव येथील बौद्ध महिला सखुबाई यशवंत सोनवणे या त्यांच्या शेतात कष्ट करून आपले व कुटुंबाची दिनचर्या भागवतात . दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सखुबाई सोनवणे या त्यांच्या जाऊ अनुराधा लक्ष्मण सोनवणे यांच्यासोबत शेतात काम करत असताना इंजेगावचे गावचे सरपंच यांचे पती अमोल मारुती कराड व त्यांचे सहकारी शिवहार गोपाळ कराड, श्याम सुखदेव कराड, विकास महादेव कराड यांनी त्यांच्याशी धक्काबुक्की करत मारहाण केली. व जीवे मारण्याची धमकी दिली तसेच चाकूने दंडावर वार केल्याचे सखुबाई सोनवणे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटल आहे.सखुबाई यशवंत सोनवणे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिसांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी आरोपी अमोल मारुती कराड, शिवहार गोपाल कराड ,श्याम सुखदेव कराड व विकास महादेव कराड सर्व राहणार इंजेगाव, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड यांच्याविरुद्ध कलम 118 (1) , कलम 115(2), 352, 351 ( 2), 351( 3), 3(5), तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(r),3(1)(s),व 3(2)(va) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेतील सर्व आरोपींना अद्यापही अटक झाली नसल्याने त्यांना तात्काळ अटक करावे अशी मागणी सखुबाई सोनवणे यांनी केली आहे. या घटनेने आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news