न्याय पैशाने विकला जातोय जर,
का,ना आठवेल त्यांना तो आंबेडकर।
शब्द सामर्थ्य त्याचे होते रे प्रखर,
लाख विरोधात पण कापायचे थरथर।
न्याय कक्षेत गोंधळ घडू लागले।१।
मुडदे पाडून निष्पाप रानोमाळ,
केले बंद किती खटले झाले गहाळ।
लेखी तक्रार देऊन पिडीतांनी,
सत्य ओठात पण बोलेना कोणी।
न्यायधीश पद सोडुन दडु लागले।२।
जळेंअस्तीत्व पण कुणी ना दक्ष,
सत्तेच्या टुकड्याकड यांच लक्ष।
सत्ताधाऱ्यांनी यांना बनविल भक्ष,
तरी त्यांच्या चाकरी हेच अध्यक्ष।
संतोष काळीज मनी धडधडु लागले।३।
कवी संतोष घुगे
मु. पोहेटाकळी
पो. पाथरी.
ता. पाथरी. जी. परभणी।
संपर्क:७४९८७१९९३०