Saturday, April 5, 2025

सावधान!उमेदवारासह निवडणुकीविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यास ग्रुप ॲडमिन जबाबदार. पाथरी पोलीसांकडून सर्व व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन व सोशल मीडिया चालवणाऱ्यांना काढली नोटीस

Spread the love

पाथरी(लक्ष्मण उजगरे) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाथरी पोलीस दल अधिक सतर्क झाले असून व्हाट्सअप ग्रुप सोशल मीडियावर पोलिसांची विशेष नजर राहणार असून कोणत्याही उमेदवारासी संबंधित निवडणुकीबाबत किंवा धार्मिक-भाषिक तसेच जातीय दोष पसरवणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट व्हाट्सअप किंवा इतर सोशल मीडियातुन केल्यास त्या संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरण्यात येईल त्या अनुषंगाने त्यांच्यावर कायदेशीररीत्या कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी दी.२२ आक्टोबर मंगळवार रोजी काढलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.

   पाथरी पोलिसांनी सर्व व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन सदस्यांसह सोशल मीडिया वापरणाऱ्यांना आज एक नोटीस बजावली आहे त्यामध्ये म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाली आहे त्या अनुषंगाने सोशल मीडियावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक स्तरावर अवहेलना होईल अशा आक्षेपार्ह टीका, टिप्पणी,मजकूर,फोटो(एडीटींग/मार्फिंग) प्रसारित करणे आठवा आलेल्या एखाद्या पोस्टवर आपले आक्षेपार्ह मत पोस्ट करणे आणि ती पुन्हा फॉरवर्ड करणे त्याचबरोबर मतदाराचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक-भाषिक तसेच जातीयद्वेष पसरवणारे आक्षेपार्ह मजकूर,फोटो, व्हिडिओ (एडीटींग/मार्फींग) करून प्रसारित करणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मीडिया ग्रुप निर्माण करून त्याद्वारे आक्षेपार्ह मजकूर,फोटो,व्हिडिओ (एडिटिंग/मार्फींग) करून प्रसारित करणे कुठले व्हाट्सअप ग्रुप मध्ये आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद होईल अशी पोस्ट अथवा मजकूर फोटो व्हिडिओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिन ला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.सर्व व्हाट्सअप ग्रुप एडमिन सदस्यांनी या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असून यासंदर्भात आदर्श आचारसंहिता भंग झाल्यास व्हाटस अप ग्रुप ॲडमिन व संबंधितास जबाबदार धरून त्याच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.सदरील नोटीस संदर्भात ग्रुप ॲडमिन व इतर सदस्य यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून पुरावा म्हणून न्यायालयासमोर सादर करण्यात येईल अशी तंबी पाथरी पोलीसांकडून एका नोटीस द्वारे देण्यात आली आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news