महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महिलांनी ठसा उमटविला आहे.भलेही महिलांना हवं तेवढं नेतृत्व करण्याची संधी मिळाली नसेल पण त्यातही जी संधी मिळाली किंवा चालून आली त्या संधीच सोनं केलं नाही तर नवल. अश्या महिला राजकारणी कायम राजकारणातील केंद्रबिंदू राहिल्या आहेत.यात अनेक महिलांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं तर अनेकांनी राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करून स्वतः भोवती राजकारण फिरवलं. त्यापैकी एक महिला नेत्या म्हणजे पंकजा मुंडे.जरी राजकारणात यशस्वी होण्यासाठी राजकीय वारसा मिळाला असेल तरी शेवटी राजकारणात स्वतःला सिद्ध करावच लागतं.पंकजा मुंडे यांना राजकारणात राजकीय वारसा घरातून मिळाला असला तरी त्यांनी वडिलांच्या निधनानंतर स्वतः संघर्ष करीत राजकारणात आपलं स्थान सिध्द केलं मग संघर्ष यात्रेच्या माध्यमातून असेल किंवा परिक्रमा यात्रा असेल. महाराष्ट्रातील राजकारण पंकजा मुंडे या नावाभोवती फिरत .हे कोणालाही मान्य करावं लागेल. कारण, त्यासाठी त्यांनी अथक संघर्ष केला आहे.त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होत असते. देशातील किंवा राज्यातील राजकीय घडामोडी घडत असताना पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत नाही असे शक्य नाही. त्यांच्या नावाची चर्चा कोणत्याही पक्षांत या ना त्या कारणाने सुरू असते. महाराष्ट्रातील ओबीसींचा महिला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी त्यांनी कधी ओबीसीच भांडवल केलं नाही. एक सर्वसमावेशक राजकारण केलं.अमुक तमूक जातीच्या राजकारणाला पंकजा मुंडे नांव कधीच चिकटलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशभरातील तमाम बहुजन समाज त्यांच्याकडे बहुजन नेतृत्व म्हणून पाहतो.आज परिवर्तनाची सुरुवात करण्यासाठी समतेचा विचार रुजविण्यासाठी बहुजन नेतृत्व पुढे येत आहे.त्यात गोपीनाथ मुंडे यांच्यापासून समतेचा आणि बहुजन विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पंकजा मुंडे सतत संघर्षरत असतात. महाराष्ट्र हा महापुरुषांचा आणि त्यांचा विचार कधी जातीपातीचा नव्हता तर तमाम बहुजनांच्या कल्याणासाठी होता. हे वेगळं सांगण्याची गरज नाही तेच महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नेतृत्वाची तितकीच गरज आहे.जातीपातीच राजकारण पुन्हा डोके वर करू पाहत असताना, बहुजन नेतृत्वाची गरज असण साहजिक आहे.
गोपीनाथ मुंडें यांच्या निधनानंतर बीड जिल्ह्यातील जनतेसाठी काही क्षणानंतर पंकजा मुंडे यांनी डोळे पुसले आणि बीड जिल्ह्यातील जनतेची अस्मिता असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणार्या जनतेसाठी त्या पुढे सरसावल्या पोरक्या झालेल्या समाजाची माऊली झाल्या. वडीलांच्या निधनाच दुःख गिळून त्यांनी समाजाला सावरलं. असे नेतृत्व सहजासहजी तयार होत नाही. त्यासाठी शिव -शाहू- फुले -आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी सोबतीला लागते.त्यासाठी महापुरुष समजून घ्यावे लागतात. पंकजा मुंडे यांना राजकीय वारसा वडिलांकडून मिळाला असे सहज म्हणता येते.पण,तो वारसा टिकविण्यासाठी अविरत संघर्ष करावा लागतो हे विसरून चालणार नाही.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि तो पराभव जिव्हारी लागल्याने बीड जिल्ह्यातील पाच जणांनी आत्महत्या केल्या.मला वाटत ही देशातील एकमेव घटना असेल की, एखाद्या नेत्याच्या पराभवामुळे कोणी आत्महत्या करेल.एवढं प्रेम कोणी कोण्या नेत्यांवर करतं असेल असे क्वचितच .वडिल गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य कार्यकर्त्यांपासून भारतीय जनता पक्षात केलेला संघर्ष आणि बीड जिल्ह्यातील तमाम बहुजनांच्या हक्कासाठी केलेले आंदोलने त्यातून तावून सुलाखून निघालेल्या नेत्याची केंद्रीय मंत्री पदापर्यंतची वाटचाल सामान्य नव्हती ती तितकीच खडतर होती तर त्यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यावर कौटुंबिक आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणार्या जनतेची जबाबदारी हा सुद्धा सामान्य संघर्ष नाही.भारतीय जनता पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेऊन , महाराष्ट्रात भाजपची सत्ता २०१४ साली आली आणि पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.त्यांना मंत्री मंडळात ग्रामीण विकास व जलसंधारण मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आणि त्यांनी संधीच सोनं केलं.२०१४ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळातील कामकाज पाहून जनतेने पुन्हा यूती ला निवडून आणले तर भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून दिले हे कार्याचे फलित. तत्कालीन राजकीय घडामोडी काय घडल्या हे सांगावयास नको.ते माहिती असेल. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ यांच्या व जलसंधारण कामांना जनतेने कौल दिल्याचे कुणालाही मान्य करावच लागेल.असो, पंकजा मुंडे या संधीच सोनं करू शकतात हे महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्व पक्षांतील नेत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. जनतेच्या आशा आकांक्षाच दुसरं नांव म्हणजे पंकजा मुंडे आहे. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने केलेला लेखप्रपंच.
– पदमाकर उखळीकर ,
मो.९६३७६७९५४२ .