सहायक दुय्यम निबंधक औदुंबर लाटे यांनी तालुका गंगापूर आणि तालुका वैजापूर येथे कार्यरत असताना आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून केलेल्या बोगस दस्त नोंदणी प्रकरणी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांनी दिली चौकशीचे आदेश
भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांना औदुंबर लाटे यांनी केलेल्या बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी एक निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये त्यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीर दस्त नोंदणी केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करून त्यांनी केलेल्या दस्त नोंदणीची चौकशी करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले यामध्ये ते गंगापूर तालुक्यामध्ये सब रजिस्टर या पदावर असताना काही प्लॉट व्यवसायिकांना हाताशी धरून बेकायदेशीर दस्त नोंदणी केल्या त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या सासूबाईंच्या नावे तुकडा बंदी कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी केले परत त्याच आधारे काही दिवसांनी त्यांनी त्यांच्या पत्नी सौ सुवर्ण औदुंबर लाटे यांच्या नावाने बक्षीस पत्राची दस्त नोंदणी करून शासनाचा महसूल बुडवला आहे आपल्या शासकीय पदाचा गैरवापर करून त्यांनी प्लॉट व्यवसायिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा करून दिला आहे गंगापूर येथे कार्यरत असताना त्यांनी बेकायदेशीर दस्त नोंदणी पुढील प्रमाणे केले आहे दस्त क्रमांक 1)5659 , 2)5353, 3) 1365, 4) 4668, 5)5155; 6) 5154 असे असून अनेक प्रकारच्या गैर पद्धतीने दस्त नोंदणी त्यांनी केली आहे त्यानंतर वैजापूर येथे कार्यरत असताना त्यांनी पुढील प्रमाणे दस्त नोंदणी केले आहे: 1) 1705 , 2) 1704, 3) 1814, 4) 1821, 5) 1083, 6)1080, 7) 1435, 8)1085 अशा अनेक प्रकारच्या दस्त नोंदणी श्री औदुंबर लाटे यांनी केले आहे दस्त नोंदणी करताना त्यांनी प्रमाणुबुत क्षेत्र व इतर कायदेशीर बाबी चे उल्लंघन त्यांनी केले आहे या अगोदरही त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने लाच घेताना अटक केली होती (अँटी करप्शन) एवढे असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी परत( महत्त्वाच्या पदावर) की पोस्ट या पदावर काम करण्याची संधी दिली