*नरळद मानवत(प्रतिनिधी)मानवत तालुक्यातील मौ. नरळद येथील दलित वस्तीमधील मुख्य रस्त्याची अत्यन्त दयनिय अवस्था झाली असून रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्याना एक प्रकारे तळ्याचे स्वरूप आले असल्याचे आपणास पाहवयास मिळत आहे तरी याकडे मात्र संबंधित ग्रामपंचायत प्रशासन डोळे झाक करत आहे सदरील रस्ता दलित वस्तीचा रस्ता मुख्य रस्ता आहे तसेच या ठिकाणी सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोण त्याही प्रकारे नालीची व्यवस्था नसल्या मुळे पाऊस झाला की रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचून दुर्गधी पसरत आहे जवळच बुद्धविहार व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि समाज मंदिर असून परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचत असून येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तसेच बुद्ध विहारात पौर्णिमे पासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येथील परिसरात मोठ्या प्रमाणात नालीचे घाण पाणी व पावसाचे पाणी साचत असून याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे संबंधीत ग्राम पंचायतने याकडे लक्ष न दिल्यास वंचित बहुजन युवा आघाडी चा वतीने वरीष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येईल अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रंजित तुपसमुंद्रे, संतोष तुपसमुंद्रे, गोविंद तुपसमुंद्रे, लहू तुपसमुंद्रे, निशांत तुपसमुंद्रे, यांनी दिली.येथील दलितवस्ती मधील रस्त्याची दयनीय अवस्था* > नालीचे सांडपाणी सभागृहा समोरील रस्त्यावर > रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप ; ग्रामपंचायतचे मात्र दुर्लक्ष
- Advertisement -![spot_img]()