अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील क्षेत्रफळाने मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील राज्यप्रणाली ‘अध्यक्षीय लोकशाही’ आहे.हे ठाऊकच आहे. अमेरिकेत सध्या अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.युनायटेड स्टेट्स ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. याचा अर्थ सरकार नागरिक निवडतात. युनायटेड स्टेट्समधील मूळ अमेरिकन नसलेल्या लोकांमध्ये थेट लोकशाहीचा इतिहास न्यू इंग्लंड वसाहतींमध्ये १६३० पासूनचा आहे. न्यू इंग्लंड वसाहतींच्या विधानमंडळांना सुरुवातीला लोकप्रिय असेंब्ली म्हणून शासित केले जात होते, प्रत्येक स्वतंत्र व्यक्ती अधिकाऱ्यांच्या निवडणुकीत आणि कायद्यांचा मसुदा तयार करण्यासाठी थेट मतदान करण्यास पात्र होता.अमेरिकन लोकशाही देश विकसित झाला त्याची कारणे म्हणजे सुशिक्षित आणि दृढनिश्चयी स्थायिकांपासून सुरुवात करून त्यांनी विश्वासार्ह शेती, मूलभूत उद्योग आणि विश्वासार्ह शाळा स्थापन केल्यावर त्यांनी नवनवीन संशोधन करायला सुरुवात केली. नवकल्पनांनी नवीन उद्योगांची निर्मिती केली, ज्याने नवीन संपत्ती दिली, ज्याने अधिक शिक्षणाला अनुमती दिली, ज्याने अधिक नवकल्पनांना प्रोत्साहन दिले आणि ही प्रक्रिया चालू राहिली त्यामुळे अमेरिका विकसित झाला .या विकसित राष्ट्रांच्या निवडणुका म्हणजे जगाचे लक्ष.यंदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस तर रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उभे आहेत.आपापली बाजू मांडण्यासाठी ते मतदारांना पटवून देत आहेत.डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असतानाची म्हणजे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पूर्वी त्यांची कारकीर्द अमेरिकेच्या इतिहासात वादग्रस्त ठरली ती म्हणजे परकीयांना विरोध केल्याने.असो, मात्र रिपब्लिकन पक्षाची मुळात विचारधारा ही पुराणमतवादी आहे. त्यामुळे अमेरिकेत मुख्यतः पुराणमतवादी किंवा उदारमतवादी असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता राहिली आहे.त्यामुळे या दोनच पक्षाची सत्ता अमेरिका नागरिकांना लोकशाही शासन देते. पुराणमतवादी विचारधारा पुरातन काळापासून चालत आलेल्या पारंपरिक प्रथा व संस्कृती जोपासली जाते.नवे विचार स्विकारायला वेळ लागतो किंवा अगदी पुरातन गोष्टीला चिकटून असतात.युनायटेड किंग्डममधील हुजूर पक्ष, भारतामधील भारतीय जनता पक्षाची धोरणे देखील पुराणमतवादाकडे झुकणारी आहेत. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची पुराणमतवादी विचारधारा आहे.खर तर लोकशाही म्हणजे मुळात परिवर्तन घडवून आणणारी प्रकिया. याऊलट डेमोक्रॅटिक पक्ष आहे. उदारमतवाद हे स्वातंत्र्य आणि समता यावर आधारित आहे. उदारमतवादी लोक समता, बंधुता या तत्त्वाचा दृष्टीकोन बाळगतात.लोकशाही, मुक्त आणि प्रामाणिक निवडणूका, नागरी अधिकार, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, मुक्त व्यापार, आणि खाजगी मालमत्ता ह्यांसारख्या विचारांचे समर्थन करतात.त्यामुळे अमेरिकेत पुरातनवादी आणि उदारमतवादी विचारांच्या या दोन्ही पक्षाची सत्ता राहिली आहे.हा विचारांतील फरक तर वर्णद्वेष आणि आपल्याकडे जातीवाद या दोन्ही बाबी लोकशाही देशाच्या विकासातील आव्हान.आपल्याकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निव्वळ पुरातनवादी किंवा पुरोगामीवादी (पुरोगामी)अशा कोणत्याच पक्षाला बहुमत दिले नाही.ही बाब खरी पण आपण म्हणतो तसे एक तर पहिला किंवा शेवटचा मध्याला किंमत नसते तसे आता सरकारचे झाले आहे. असो, अमेरिका पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला निवडून देते कि रिपब्लिकन पक्षांच्या उमेदवाराला त्यावरून अमेरिकेत पुरातनवादी किंवा उदारमतवादी विचारांच्या पक्षाचे सरकार येईल.डेमोक्रॅटिक पक्षाच्या आजवरच्या अध्यक्षांची कारकीर्द अमेरिकेच्या इतिहासात लक्षात ठेवणारी ठरली आहे.अँड्र्यू जॅक्सन, मार्टिन वान ब्युरन,
जेम्स पोक , फ्रॅंकलिन पियर्स , जेम्स ब्युकॅनन,अँड्र्यू जॉन्सन ग्रोव्हर क्लीव्हलॅंड,वूड्रो विल्सन , फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट हॅरी ट्रुमन,जॉन एफ. केनेडी, लिंडन बी. जॉन्सन ,जिमी कार्टर , बिल क्लिंटन ,बराक ओबामा ,ज्यो बायडेन यांचा कार्यकाळ तर प्रत्येक अमेरिकन नागरिकांना अभिमान वाटावा असा.तर आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील, लेखिका आणि राजकारणी कमला देवी हॅरिस राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून आहेत. २०१० मध्ये झालेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची ॲटर्नी जनरल पदावर राहिल्या आहेत. त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ३२ व्या ॲटर्नी जनरल आहेत. ७ नोव्हेंबर, २०२० रोजी त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून गेल्या.कमला देवी हॅरिस अध्यक्षपदाच्या उमेदवार निवडून आल्या तर अमेरिकेच्या इतिहासात त्यांची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून नोंद होईल. यापूर्वी त्यांनी पहिली महिला उपाध्यक्ष म्हणून इतिहासात नांव आहे आता अमेरिकेला उदारमतवादासह पहिली महिला राष्ट्राध्यक्ष निवडण्याची संधी जवळ आली आहे.
– पदमाकर उखळीकर ,
मो.९६३७६७९५४२.