मॉन्टेसरी शिक्षण सध्या अनेक पालक आपल्या पाल्यांना देण्यासाठी धडपड करतायेत. अगदी मजूरी करणारे म्हटले तरी वावगे ठरू नये. मुलांच्या नेतृत्वाखालील शिक्षणाचे वातावरण हे मॉन्टेसरी नर्सरीचे मुख्य तत्वज्ञान आहे. मुलांना त्यांचे स्वतःचे क्रियाकलाप निवडण्याचे स्वातंत्र्य आणि त्यांना त्यांच्या गतीने कार्य करण्यास प्रोत्साहित केले जाते. मॉन्टेसरी नर्सरी या कल्पनेवर आधारित आहे आणि मुलांमध्ये वातावरण आत्मविश्वास, स्वाभिमान आणि शिक्षणाबद्दल कुतूहल वाढवण्यास मदत करते.आता मॉन्टेसरी शिक्षण पध्दती ग्रामीण भागात पाय पसरु लागली आहे.माँटेसरी शिक्षण पद्धती ही एक प्रकारची शैक्षणिक पद्धत आहे .ज्यामध्ये औपचारिक शिक्षण पद्धतींऐवजी मुलांच्या नैसर्गिक आवडी आणि त्यांचे काही छंद जोपासले जातात. मॉन्टेसरी वर्ग प्रत्यक्ष- जागतिक कौशल्ये शिकण्यावर आणि विकसित करण्यावर भर दिला जातो. मुलांच्या सर्वांगीण स्वातंत्र्यावर ही पुर्व प्राथमिक शिक्षण पध्दती भर देते आणि मुलांना नैसर्गिकरित्या ज्ञानासाठी उत्सुक प्राथमिक शिक्षणासाठी बौद्धिक सक्षम करते.ही पद्धत २० व्या शतकाच्या सुरुवातीस इटालियन फिजिशियन मारिया मॉन्टेसरी यांनी सुरू केली होती. तेव्हापासून ही पद्धत जगाच्या अनेक भागांमध्ये, सार्वजनिक आणि खाजगी शाळांमध्ये सारखीच वापरली सुरू आहे. मॉन्टेसरी शिक्षणाबाबत २०१७ ला एक अहवाल सादर करण्यात आला.यात असे नमूद केले की मॉन्टेसरी पद्धतीचे काही घटक प्रभावी आहेत, असे विस्तृत पुरावे अस्तित्वात आहेत. अभ्यास अनेक पद्धतशीर मर्यादांमुळे ग्रस्त आहेत. त्याच वेळी, असा निष्कर्ष काढण्यात आला की मूळ तत्वांना चिकटून राहणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणाचा मुलांना संज्ञानात्मक आणि सामाजिकदृष्ट्या फायदा होतो.सोसायटी फॉर रिसर्च इन चाइल्ड डेव्हलपमेंटच्या १९७५ च्या प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की मॉन्टेसरी प्रोग्राम अंतर्गत प्री -के ते ग्रेड २ पर्यंतच्या चार वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी स्टॅनफोर्ड – बिनेट इंटेलिजेंस स्केलवरील मुलांपेक्षा जास्त सरासरी गुण होते. मिलवॉकी पब्लिक स्कूल्समधील आणखी एका अभ्यासात असे आढळून आले की ३ ते ११ वयोगटातील मॉन्टेसरीमध्ये शिकलेल्या मुलांनी अनेक वर्षांनंतर गणित आणि विज्ञान या विषयांवर त्यांच्या हायस्कूलच्या वर्गमित्रांना मागे टाकले; दुसऱ्याला असे आढळून आले की मॉन्टेसरीचे मूल्यमापन केलेल्या सर्व कार्यक्रमांच्या उपलब्धतेवर सर्वात मोठे सकारात्मक प्रभाव पडले. असे अनेक सकारात्मक आंतरराष्ट्रीय अहवाल मॉन्टेसरी शाळेबाबत आहेत. मॉन्टेसरी शाळेबाबत सकारात्मक विद्यार्थी घडत आहेत म्हणजे मॉन्टेसरी शाळेच्या व्यतिरिक्त विद्यार्थी घडत नाहीत असाही भाग नाही.हे विशेष.असो मात्र मॉन्टेसरी हा शब्द आला कसा हे जाणून घेण्याचे कुतूहल अनेकांना असेल.हा शब्द इटलीतील शिक्षणतज्ज्ञ आणि डॉक्टर असलेल्या मारिया टेक्ला आर्टेमिसिया माँटेसॉरी यांच्या नावावरून मॉन्टेसरी शब्द आला आणि मॉन्टेसरी शाळा जगभरातील अनेक देशांत स्थापन झाल्या. इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ, पूर्वप्राथमिक शाळांना माँटेसरी या नावाने ओळखले जाते त्या माँटेसरी मारिया यांचा जन्मदिन.३१ ऑगस्ट, १८७० साली त्यांचा जन्म झाला.
या इटालियन डॉक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी पुरस्कृत केलेली लहान मुलांसाठीची शिक्षणपद्धती जगभरात वापरली जाते. ज्यामुळे मुलांच्या नैसर्गिक गुणांना वाव मिळतो. त्यातून त्यांच्यातील विशेष गुण पुढे येऊन तो विद्यार्थी त्यात भविष्यात करिअर घडवू शकतो. त्यासाठी या शाळा महत्वाच्या आहेत.कारण, धकाधकीच्या आणि एक्सप्रेस च्या वेगाने जगण्याच्या शैलीमध्ये मुलांकडे लक्ष देण्यासाठी अनेकांना वेळ नाही.त्यामुळे मुलांमधील नैसर्गिक गुण आपण कसे ओळखू त्यासाठी या शाळेचे महत्त्व नाही म्हटले तरी आहे.
मारिया माँटेसरी या लहानपणी मुलांच्या शाळेत प्रवेश घेतला आणि त्यांनी अभियंता होण्याचे ठरविले .परंतु ,नंतर हा बेत बदलून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोमच्या सापिएंझा विद्यापीठातून त्या वैद्यकीय पदवी मिळविणाऱ्या पहिल्या काही स्त्रियांमध्ये होत्या. १८९६ साली त्या वैद्यकीय पदवीधर झाल्या.१८९६ ते १९०१ पर्यंत, मॉन्टेसरी यांनी तथाकथित “फ्रेनेस्थेनिक” मुलांसोबत काम केले आणि संशोधन केले. आजारपण किंवा अपंगत्व अनुभवणारी मुले यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांनी लहान वयाच्या बालकांच्या विकासासाठी पुढाकार घेतला आणि शिक्षणक्षेत्रात स्वतः ला झोकून दिले.त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करून अभ्यास केला त्या मुलांविषयी बोलू लागल्या आणि त्याबाबत लेखन करू लागल्या. महिला अधिकार आणि शिकण्यात अडचणी असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या म्हणून त्यांची प्रसिद्धी जगभरात झाली. मारिया माँटेसॉरी यांनी भारतात शिक्षण पध्दतीत बदल घडवण्यासाठी आल्या होत्या. थियोसोफिकल सोसायटीच्या सदस्या होत्या. १९३९ मध्ये त्या चेन्नईच्या थियोसोफिकल सोसायटीमध्ये आपल्या शिक्षणपद्धतीचा वर्ग घेण्यासाठी आल्या होत्या.१९४० मध्ये इटलीने जर्मनीच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केल्यावर युनायटेड किंग्डमने स्वतः च्या साम्राज्यातील सगळ्या इटालियन व्यक्तींना जेरबंद केले. यांत माँटेसॉरी यांचा मुलगा मारियो सुद्धा होता. मारिया माँटेसॉरींना थियोसोफिकल सोसायटीच्या आवारात बंदिस्त ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांनी मारियोला आपल्या आईबरोबर राहण्यास परवानगी दिली गेली. त्यानंतर दोघेही चेन्नई व कोडाईकॅनाल येथे राहिले होते. त्यांना भारतात शिक्षण देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मारिया व मारियो दोघेही महायुद्ध संपेपर्यंत भारतातच राहिले व १९४६ मध्ये ते नेदरलँड्स व युरोपला परतले. मॉन्टेसरी यांनी निरीक्षणांवर आधारित, बालवाडीतील मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक पद्धती लागू केल्या. त्या त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि पद्धतीचे वैशिष्ट्य बनल्या. त्यांनी जड फर्निचरच्या जागी,मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे यांचा वापर सुरू केला. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आणि स्वयंपाक करणे, झाडू मारणे, धान्य निवडणे, भाजीपाला निवडणे यासारख्या कृतींचा समावेश शिक्षणामध्ये केला. त्यांच्या भारतातील वास्तव्यात त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रयोगांवर आधारित व्याख्याने दिली, प्रशिक्षण वर्ग चालविले. त्यांच्या हाताखाली अकराशे शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आणि माँटेसरी शाळा सुरू केल्या. त्याच्या कार्याचा प्रभाव भारतात गिजुभाई बधेका, सरलादेवी साराभाई आणि ताराबाई मोडक यांच्यावर पडला. त्यांनी सुरुवातीला माँटेसरी संघ स्थापन केला. माँटेसरी शाळा आर्थिक बाबींमुळे परवडत नाहीत ही ओरड नवी नाही त्यामुळे त्यासाठी खासगी शाळांनी शुल्क मिनिमम कसे करता येईल जेणेकरून सर्वंच स्तरांतील पाल्यांना आपले पाल्य त्या शाळेत पाठवू शकतील.तर पुढे माँटेसरी शाळा शासकीय सुध्दा व्हाव्यात ज्यामुळे निःशुल्क. माँटेसरी शिक्षण घेता येईल. मारिया माँटेसरी यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्त हेच खरे अभिवादन ठरेल!
– पदमाकर उखळीकर ,
मो.९९७५१८८९१२ .