Saturday, April 5, 2025

*वंचितला सोनपेठ तालुक्यामध्ये खिंडार* *माजी तालुकाध्यक्ष हनुमान पंडित व माजी तालुकाध्यक्ष रामेश्वर पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दाखल*

Spread the love

पाथरी(लक्ष्मण उजगरे) येवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनपेठ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार पडले आहे.वंचित बहुजन आघाडीचे दोन माजी तालुकाध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या गटामध्ये प्रवेश केला असून यामुळे सोनपेठ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

         सविस्तर वृत्त असे की, वंचित बहुजन आघाडीला सोनपेठ तालुक्यात मोठी खिंडार पडली असून वंचित बहुजन आघाडीचे दोन माजी तालुका अध्यक्षांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामध्ये हनुमान पंडित व रामेश्वर पंडित यांनी मागील त्यांच्या आयुष्याच्या 21 ते 22 वर्षापासून पूर्वीची भारिप व आताची वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये निष्ठेने काम केले. यामध्ये हनुमान पंडित यांनी सर 2019 ते 2023 पर्यंत तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. त्याचबरोबर रामेश्वर पंडित यांनी 2017 ते 2019 या सालामध्ये सोनपेठ तालुका अध्यक्ष म्हणून तालुक्यात काम केलेले आहे परंतु यांच्या प्रवेशाने सोनपेठ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ग गटाचा नक्कीच मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.यावेळी सोनपेठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष रावसाहेब मोकाशे,सरपंच आत्माराम रणखांबे,शरद झाडे इत्यादींची उपस्थिती होती.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news