पाथरी(लक्ष्मण उजगरे)आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पाथरी, मानवत,सोनपेठ आणि परभणी ग्रामीण हा भाग पाथरी विधानसभा मतदार संघात येतो. वंचित बहुजन आघाडीत निष्ठेने पक्षाचे काम करीत असताना, बदलत्या राजकीय परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी या राजकीय कडून समाज हिताचे काम करण्यासाठी वेळोवेळी होत असलेली अडवणूक दूर करून बौद्ध समाजाचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी पाथरी, मानवत,सोनपेठ आणि परभणी ग्रामीण या भागातील वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली आज दि.23 सप्टेंबर सोमवार रोजी शहरातील पीपीएल.मैदानावर आयोजित केलेल्या
ऐका मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष शामराव ढवळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष देविदास मस्के,सोनपेठ चे माजी तालुकाध्यक्ष रामेश्वर पंडित, हनुमान पंडित, मानवत चे माजी तालुका अध्यक्ष एडवोकेट मिलिंद तुपसमुंदर,संजय हजारे,शशिकांत पंडित, माजी सरपंच गणेश निसगंध, भास्कर पंडित, सुरेश अंभोरे, आनंद मनेरे,परमेश्वर निसगंध, मिलिंद डोंगरे यांच्या सह पाथरी,मानवत सोनपेठ, परभणी ग्रामीण
भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष भीमराव हत्तीअंभिरे,दत्ता मायदंळे(संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी),शाम धर्मे(उपसभापती कृ.उ.बा.पाथरी) सदाशिव थोरात,जिजाभाऊ साळवे,संदीप भदर्गे,विलास ढवळे ,अमोल धनले आदींची उपस्थिती होती .तर वरील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षात प्रवेश केला.
BREAKING NEWS