Saturday, April 5, 2025

*नामदार मेघना दीदी बोर्डीकर व आमदार राजेश दादा विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा 10 जानेवारी रोजी पाथरी येथे भव्य नागरी सत्कार*

Spread the love

 

पाथरी( लक्ष्मण उजगरे)नामदार मेघना दीदी बोर्डीकर , आमदार राजेश दादा विटेकर रत्नाकर गुट्टे यांचा नागरी सत्कार सोहळा पाथरी येथील कै. स. गो. नखाते माध्यमिक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे नागरी सत्कार सोहळा समितीची दि 8 जानेवारी बुधवार रोजी रोजी विश्रामगृह पाथरी येथे बैठक झाली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

     या बैठकीत ना मेघना दीदी बोर्डीकर यांच्या रूपाने खूप वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याबद्दल व आमदार राजेश दादा विटेकर व आमदार रत्नाकर गुट्टे यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल पाथरी तालुक्यातील राष्ट्रवादी भाजप, शिवसेनेच्या महायुतीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे हा सत्कार सोहळा दि 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता कै. स. गो. नखाते माध्यमिक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात प्रांगणात होणार आहे तत्पूर्वी सेलू कॉर्नर ते साईबाबा मार्गावरून जिल्हा परिषद पर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे

या नागरी सत्कार सोहळ्याला अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने राहणार आहेत कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिक सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले

- Advertisement -spot_img
Latest news
Related news