Sunday, July 20, 2025

एक होती रोशनी…….? झुंज जीवनाशी भाऊसाहेब सोनकांबळे यांचा विषेश लेख

Spread the love

एक होती रोशनी…….?

अलीकडच्या काळात आत्महत्याच्या घटनेने चढत क्रम वाढल्याचे दिसून येत आहे. दररोज रोज कूठेना कूठे कुठल्यातरी निमित्याने आत्महत्या होत आहेत.जरा आपन आपल्या मनाला थोड विचारा की, माणूस सहजा सहजी आत्महत्या करेल काय ? मुळीच नाही. त्यामागे कारण मात्र नक्की असेलच. आपण काय करतो. तेवढी पेपर वरची, टीव्ही न्यूज वरची बातमी वाचतो, पहतो. ‘आरे…रे, खुप वाईट झालं ? अस घडायला नको होत ? बस एवढच तुमच चिंतन काय ? पण ज्यांच्या घरी आत्महत्याची घटना घडते. त्यांच्या घरी काय वास्तव असेल हे फार कमी लोक जाणून घेत असतात. काही लोक घटना घडून गेल्यावर येतात ग्यान पाजायला. मी फलान सांगीतल होत. बिस्तान सांगीतल होत. काही गरज नसते हो असल्या लोकांची ? फुकटचे सल्ले देणारे. पन नांदेड येथील एका मुलीने दहावीत कमी गुण मिळाले म्हणून तिने जे पाऊल उचलले ते मन हेलावून टाकणारे आहे.

नांदेड शहर हे शैक्षणिक दृष्ट्या सध्या नवाजलेले दिसून येत आहेत. चांगला रिझल्ट लागत असल्याुळे ईथे मुली व मुले आपल उज्वल भविष्य घडविण्या करिता दुरून दुरून येत असतात. आताच काही दिवसा पूर्वीच हदावी बोर्डाच्या परीक्षेचे ऑनलाईन रिझल्ट लागले. पास झालेले सर्व विद्यार्थी यांनी जल्लोषाचा बार उडवला. मात्र नेहमी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. सर्व जण शोशल मीडियावर आभिनंदणाचा वर्षाव केला. लेकरांच्या परिवराचा आनंद गगन भरारी घेतला. तर काही जणांना कमी मार्क पडले याचे त्यांना दुःख वाटत होते. पण त्यांच्या घरचे धीर देत होते. आता कमी पडले तर पडले. बारावीत याचा बदला घेऊ ? अस सांगून मन परिवर्तन केले गेले. तर काही जन नापास झाल्याचे दुःख सहन
करत होते. अशा वातावरणातच नांदेड येथील कु रोशनी नावाची मुलगी दहावीत ७३.८० ईतके गुण घेऊन पास झाली होती. रोशनी खुप आभ्यास करुन पास झाल्याने तीच्या परिवारातील सर्व जन खुश होते. आईने आनंदाने पेढे देखील भरून रोषणीच आभिनंदन केल. तेंव्हा रोशनीच्या आईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. आता आपल्या घरी रोशनीचा प्रकाश पडेल.
रोशनीच्या वडिलांचे काही दिवसा पूर्वीच निधन झाले होते. वडिलांचे छत्र हरवलेल्या रोशनीच्या आईने समर्थ पने संसाराचा गाडा पुढे घेऊन जात होत्या. वडील नसणाऱ्या परिवाराचा संघर्ष काय असतो. आप बिती असणाऱ्यानाच माहीत असत. रोशनीची आई मोल मजुरी करुन दोन मुलींना शिक्षित करुन मोठ करायच होत. आपली आई आपल्यासाठी राब राबते आहे. हे रोशनीला चांगलेच माहीत होते. रिझल्ट लागल्या पासून रोशनी जरा नाराज असल्या सारखी वाटत होती. तिला तीच्या आईने विचारले काय झाले ग ? नाराज आहेस काय तू ? काही नाही असे सांगीतले. काही माणसे असे असतात की, आपल्या मनात नेमक काय चालतय हे कोणलाच कळू देत नाहीत.रोशनीच्या डोक्यात एक विचार घुमत होता. तो म्हणजे आपल्याला एवढे कमी मार्क कमी कसे पडले ? ‘अस कस झाल असल बर ? मी तर खुप अभ्यास केला होता. रोशनी याच विवंचनेत होती. रोशनीने आनेक मैत्रिणीची भेट घेतली.त्यातील काही जण बोलत होत्या. अग रोशन तू तर खुप अभ्यास केला होतास, मग अस कस झालं ग ? तरी देखील यावर रोशनी काहीच बोालत नव्हती.
दुपारची वेळ होती.रोशनी नुकतीच बाहेरून घरी आली होती. घरी येताच तीच्या छोट्या बहिणीने विचारले काय झाले ? आज शांत शांत कशी ? काही नाही ग तस ? रोशनी समोर आपल्या रुम मध्ये निघून गेली. आई कामावर निघून गेली होती.रोशनीच्या डोक्यात एकच विचार मार्क कसे कमी पडले ? आता काय कराव ? पुढे आपल भविष काय ? आता काय करू ? असे अनेक विचार तीच्या डोक्यात वादळ निर्माण करू लागले होते.
यात रोशनीला नेमका कोणता निर्णय घ्यावा हे सुचतच नव्हते. तेव्हढ्यात तीची बहीन म्हणाली , काय ग, ताई काय झाल मला सांग ना ? काही नाही ग तू जरा मला एकटे सोड बर, मला काही काम आहे. आणि आता तु झोप बर, अस प्रेमान रोशनीने सांगीतल. रोशनीला आता हे जग नकोस वाटू लागल होत. आणि तिने एक अखेरचा निर्णय घेतला. तो म्हणजे जगालाच कायमचा पूर्ण विराम. कारण तिच्यात आता जगण्याची ईछा शक्ती मुळीच राहीली नव्हती. बहिणीकडे डोळेभरून पाहून डोळ्यात अश्रूच्या पुरात रोशनीने घरातली पंख्याला दोर लाऊन एका क्षणात रोशनीने आपले जिवन संपवले. मन हेलावून टाकणारे घटना रोषणीच्या बहिणीने पाहिली .मात्र सर्व काही संपून गेल होत. रोशनीच्या बहिणीने आक्रोश केला. यामुळे तिथे काही जन धाऊन आले. या घटनेची माहिती कामावर आसलेल्या आईला देण्यात आली. आई देखील घरी येऊन जे हांबर्डा फोडला तेंव्हा शेजाऱ्यांच्या देखील डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या. रोशनी एकदा उठ ग ? मला एकदा बोल ग ? मी कूठे कमी पडले. तू तर पास झाली होतीस, मला गक्त तू हवी होतीस ग ? तु मला खुप चांगले बोलत होतीस ना ? मग चल बेटा उठ ना ? असे अनेक प्रसंग सांगून रोशनीची आई रोशणीला उराशी धरून आक्रोश करत होती. या दोन आई लेकराची अवस्था जी झाली मन सुन्न करणारी होती. कारण सर्व शेजाऱ्यांना माहीत होत हा परीवार किती दयाळू आहे.
खर तर रोशनीचे जरा चुकलेच ती तर पास झाली होती. तिने नापास झालेल्यांचा विचार करुन पुढे येणाऱ्या आव्हानाला तोंड द्यायचे होते. पण आपली वेदना न सांगताच निघून गेली. आरे बेटा ठीक आहे. तू जरा जाण्याआधी कधी विचार केलाय काय आईचे कसे होईल ? बहिणीचे कसे होईल ? त्यांना या जगात कोणी आहे काय ? याचा विचार मुळीच केला नाहीत. लपवकेस केवळ तुझेच दुःख . काय ग रोशनी जगात आजही आशि बरीच माणसे आहेत की आपल दुःख कोणालाच कळू देत नाहीत. त्यातीलच तु काय ? जरा जुझ्या मनातील भावना एखाद्याला कळल्या असत्या तर कदाचीत तुझे मन परिवर्तन झाले असते. एक मिनिट जगण्याकरिता ईथे रोज धडपड करतायत आणि तू एका झटक्यात जिवन संपवलेस.
असो शेवटी निर्णय जुझा होता. हे सुंदर जग बघण्याची तुझी ईछा नव्हती.
जगाच काय घेऊन बसलीस जग दोन तोंडी बोलत असत, चांगल्याला वाईट आणि वाईटला चांगल हि जगाची जणू रीतच ? मग काय खचून जायच नाही मुळीच नाही. माणसान खचून न जाता अगदी बिंदास जगल पाहिजे. संकटाना जो घाबरतो तो जीवनात कधीच सक्सेस होऊ शकत नाहीं. हेय हट.. मला नाही जगायची असली जिंदगी ? हम तो जियेंगे.. आपणी तरह एक दम खुले आम जिंदगी. आहे कशाला मरता छोट्या छोट्या गोष्टीमुळे ये जिंदगी लाँग लाईफ नाही . रोयऱ्या सारखे आपण सर्वानाच जायचय पण मस्त जगा. ईतरांच्या दुःखात सहभागी व्हा, लोकांशी मैत्री करा, अशा सहवासात राशीला तर आत्महत्या सारखे विचारा डोक्यात मुळीच येणार नाहीत.
खरतर मला रोशनी बद्दल खुप हळहळ वाटल कारण रोशनीच्या आईने तिचे नाव रोशनी ठेवले होते. मात्र त्यांच्या घरीच का अंधार होतो. ज्यांच्याकडे रोशनी असते. ती असती तर खरच यांच्या घरातली अंधार दुर नक्कीच झाला असता ?
आज जर कोणाला रोशनी बद्दल वाईट वाटले तर, नक्कीच सर्व परीने सर्वानी मदत केली पाहिजे. कारण रोशनीच्या रुपात आज तिची बहीण आहे. मला अस वाटत की, रोशनीचे स्वप्न रोशनीची बहीण पूर्ण करेल ?
बारिश की बूँद बन जाना….ना ठोकरोसे डरणा… नाही कमकुवत शब्दोसे, उम्मिद है तुमसे, एक बार ,तुम, रोशनी बन जाना ?
जे आज तीची आई व बहीनीवर जो आजचा प्रसंग आहे. तो कोणाच्याही नशीबी न आलेला बरा. तीच्या आईला व बहिणीला संघर्षमय जीवन जगण्याचे बळ देओ हीच मनोमनी ईछा…!

झुंज जीवनाशी
भाऊसाहेब सोनकांबळे, लोहा

- Advertisement -spot_img
Latest news
Related news