Sunday, June 29, 2025

पत्नीने आयुष्याचा जोडीदार एका क्षणात केला ठार ! -मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न -गोरेगांव पोलिसांनी घेतले पत्नीला ताब्यात

Spread the love

पत्नीने आयुष्याचा जोडीदार एका क्षणात केला ठार !

-मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

-गोरेगांव पोलिसांनी घेतले पत्नीला ताब्यात

हिंगोली(प्रतिनिधी)पत्नी सोबतच्या वादात तो कत्ती घेऊन तीच्या अंगावर धावला तिने मात्र आयुष्याचा जोडीदार त्याच कत्तीने एका क्षणात ठार केल्यानंतर आपल्या हातुन अघटीत घडल्याची भावना होताच दारातील गाडीतील पेट्रोल काढून अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी(दि. ३)सेनगांव तालुक्यातील बाभुळगाव येथे घडली. आरोपी पत्नीला गोरेगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

कैलास भगवानराव गलंडे(वय ४०) हा मद्यप्राशन करून पत्नीसोबत वाद घालित होता. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कैलास हा शिवीगाळ करीत पत्नीच्या अंगावर कत्ती घेऊन गेला. यावेळी पत्नीने झटापट करत हातातील कत्ती हिसकावून घेत पतीच्या डोक्यात सपासप वार केले. डोक्यातून रक्तस्त्राव होऊन कैलास निपचित पडला. पती काहीच हालचाल करीत नाही हे पाहून पत्नी हादरली. खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी घरासमोरील दुचाकीतून पेट्रोल काढून पती कैलासचा मृतदेह पेटवून दिला. तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. मयताच्या डोक्यात कत्तीचे घाव दिसून आल्याने मयताच्या नातेवाईकांकडून सदर आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान रात्री उशिरा मयताचा मुलगा गणेश कैलास गलंडे रा. बाभुळगाव यांच्या फिर्यादीवरून आई सुमित्रा कैलास गलंडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक नितेश लेंगुळे यांच्यासह इतर पोलिसांनी बाभूळगाव येथील घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मयताच्या पत्नीला पोलिसांनी अटकही केली आहे.

___________

- Advertisement -spot_img
Latest news
Related news