Sunday, June 29, 2025

योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आपले आयुष्य बदलतो-सुदर्शन भालेराव;ॲपेक्स अकॅडमी प्रस्तुत ॲपेक्स करिअर काउन्सलींग आणी जाॅब प्लेसमेंट सेंटर व रोजगार मेळावाप्रसंगी बोलताना

Spread the love

पाथरी(प्रतिनिधी)पाथरी येथे अनिल उजगरे सरांचे ॲपेक्स करिअर अकॅडमी प्रस्तुत एका कार्यक्रमात बोलताना ट्रेनिंग मॅनेजर बि.व्ही.जी.ईंडीया.लि.पुण्याचे सुदर्शन भालेराव यांनी विद्यार्थी दशेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने आपले आयुष्य बदलते असे मत व्यक्त केले.

ॲपेक्स अकॅडमी प्रस्तुत ॲपेक्स करिअर काउन्सलींग आणी जाॅब प्लेसमेंट सेंटर व रोजगार मेळावा दी.८जुन रविवार रोजी पंचायत समिती मिनि मार्केट पाथरी येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या आयुष्यातील दहावी,बारावीचे वर्ष हे अत्यंत महत्वाचे असते या वेळी आपल्याला योग्य निर्णय घेता आला पाहीजे.त्याच बरोबर आपल्या भागात योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आपल्याला पुणे,मुंबई, नाशिक, संभाजी नगर अश्या मोठ्या शहराकडे जाव लागत होत परंतु प्रथमच आपल्या ग्रामीण भागात असे जॉब प्लेसमेंट सेंटर पाथरी सारख्या शहरात चालु करुन स्थानिक युवक युवतींना याचा खुप मोठा फायदा होणार असुन या सेंटर च्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील युवक-युवती नक्कीच मोठ-मोठ्या नोकरीवर असल्याचे पहावयास मिळणार आहे.या प्रसंगी प्रा.मिलिंद कदम,प्रविण रणवले,शेख सलिम प्रा. विकास पाथरीकर इत्यादींनी उपस्थित युवक युवतींना मोलाचे मार्गदर्शन केले.

ॲपेक्स करिअर काउन्सलींग आणी जाॅब प्लेसमेंट सेंटर व रोजगार मेळाव्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फर्मचे प्रा. विकास पाथरीकर हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन उप-प्राचार्य,ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट ऑफीसर पि.ई.एस तंत्रनिकेतन छ.संभाजीनगरचे प्रा.मिलिंद कदम,लाॅन्च पॅड छ.संभाजीनगर येथिल अनेकांना व्यवसाय उभा करुण देणारे प्रविण रणवले, गोदावरी ईग्लीश स्कूलचे संचालक शेख सलिम,ग्राममहसुल अधिकारी विजय भदर्गे,संजय उजगरे,अमोल कावळे.प्रा.अमोल भालेराव,पत्रकार सुधाकर गोंगे,डी.एल.भालेराव इत्यादीसह मोठ्या प्रमाणावर युवक युवतीसह पालकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वाचे ॲपेक्स करिअर काउन्सलींग आणी जाॅब प्लेसमेंट सेंटरचे सर्वेसर्वा प्रा.अनिल उजगरे यांनी आभार व्यक्त केले.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news